ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

माळेगावात संताप उसळला!—एकाच व्यावसायिकाला लक्ष्य करणारा पोलीस कर्मचारी कोण? नागरिकांचा थेट सवाल..!


🔥MK NEWS36 

माळेगावात नेमकं सुरु तरी काय?

एकाच धंदेवाल्याला टार्गेट करणारा पोलीस कर्मचारी कोण — नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक..!

माळेगाव —
τगेल्या काही दिवसांपासून माळेगावातील वातावरण चांगलेच तापले आहे. स्थानिकांमध्ये एकच चर्चा जोर धरत आहे—“एकाच व्यक्तीचा व्यवसाय बंद पाडण्यासाठी पोलीस कर्मचारी एवढा आग्रह का धरतोय?”

नागरिकांच्या मते, स्थानिक असल्याचे भासवणारा परंतु प्रत्यक्षात बाहेरगावचा असलेला एक पोलीस कर्मचारी गावात मनमानी करीत असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. हा कर्मचारी स्थानिक आडनाव लावून गावात मिसळण्याचा प्रयत्न करतो, आणि एकाच व्यावसायिकावर दबाव टाकून जास्त पैसे मागतो, असा नागरिकांचा आरोप आहे.

एकालाच का टार्गेट? — लोकांचा थेट सवाल

माळेगावातील नागरिकांतून एकच प्रश्न घुमतोय—
“जर काही बेकायदेशीर असेल तर सर्वांवर कारवाई होऊ द्या… मग एकालाच का?”

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एकाच व्यक्तीच्या धंद्यावर छापे, धमक्या, दबाव आणि सतत पोलीस यंत्रणेकडून चेकिंग — यामुळे प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.

लोकांचा रोष वाढतच आहे का?
“कायदा सर्वांसाठी समान असेल तर सरसकट कारवाई करा.
नाहीतर एकालाच मुद्दामून त्रास देण्यामागे काही तरी वेगळंच कारण आहे!”

‘वरिष्ठ काही करू शकत नाहीत, माझं कुणी काही बिघडवू शकत नाही’ — असा गर्विष्ठ आविर्भाव?

गावात उघडपणे चर्चा होते की संबंधित कर्मचारी वरिष्ठांचे नावसुद्धा धाब्यावर ठेवून,
“माझं काही कोणी करू शकत नाही”
अशी भाषा वापरत असल्याचे नागरिक सांगतात.

अशा प्रकारचा अहंकार व अतिरेकी वर्तन पाहून सामान्य नागरिकांचाच प्रश्न—
“हा कर्मचारी नेमका कोणाच्या दुसऱ्या धंद्यावाल्याच्या सांगण्यावरून तर करत नाही का?”

स्थानिक असल्याचे नाटक? — खरा मुद्दा पुन्हा चर्चेत?

संबंधित कर्मचारी “मी स्थानिक आहे” असा दावा करतो, पण
गावकऱ्यांच्या मते तो मूळचा बाहेरगावचा आहे आणि फक्त स्थानिक आडनाव वापरून स्वतःची पकड वाढवत आहे का?

लोक म्हणतात,
“बाहेरगावचा माणूस स्थानिकासारखा वावरतो आणि आमच्यावरच सत्ता गाजवतो… हे चित्र आम्ही का सहन करावं?”

संपूर्ण कारवाई पैशांसाठी? — नागरिकांचा संशय?

अनेकांच्या मते, एकाच व्यावसायिकाला टार्गेट करण्यामागे फक्त “पैसे उकळणे” हाच हेतू असावा असा संशय व्यक्त केला जातो.
गावात तर सरळ बोलल्या जाते—
“मागणी पूर्ण केली नाही म्हणून त्रास; आणि केली असती तर शांतता… ही कोणती कायद्याची भाषा?”

नागरिकांची मागणी — ‘समान कायदा किंवा चौकशी!’

गावकरी स्पष्ट मागणी करतात—
“जर धंदे बेकायदेशीर आहेत, तर सर्वांवर खुली, पारदर्शक कारवाई करा.
नाहीतर अशा प्रकारच्या टार्गेटेड कारवाया बंद करा.”

तसेच संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनावर वरिष्ठांकडून चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.


Translate »
error: Content is protected !!