ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

भंगारच्या हप्त्यांचा बारामतीत महासाम्राज्य — पोलीस आणि नगरपरिषद एकाच संगनमतात?


🔥MK NEWS36 

बारामतीतील भंगार साम्राज्याचा काळा चेहरा — पोलिस प्रशासन व नगरपरिषदेचा आशीर्वाद?

(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक, MK NEWS36 )

बारामती शहर आणि तालुक्यात भंगार (स्क्रॅप) व्यवसायाचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले असून, या व्यवसायामागे बेकायदेशीर हप्त्यांचा मोठा खेळ सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. शहरात गाल_ब सय्_द, मा_ली दुर्ग, अभिज_त दुर्ग, भा_मां_रे, अक्म श_ख, सुन_ल का_रे कुम_र इ🦂ळे दत्त इं🦂ळे ,धनं₹य ते_गे व रा_ज श_ख सम_र ख_नअशा अनेक नावांची चर्चा सध्या रंगत आहे. बारामती शहरातच तब्बल अठरा ते बावीस भंगार दुकानं कार्यरत असून, तालुक्यात त्याचा आकडा अधिकच वाढत चालला आहे.

नागरिकांचा स्पष्ट सवाल असा आहे की — “हे सर्व प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू असताना पोलीस आणि नगरपरिषदेचे अधिकारी मूक प्रेक्षक का?” कारण जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवहार चालू असतील, तर हे शंभर टक्के कुठेतरी “आर्थिक देवाणघेवाणी”चे जाळे असल्याशिवाय शक्य नाही, असा नागरिकांचा ठाम आरोप आहे.

यामध्ये बारामती शहरातील “रा_ज श_ख” या व्यक्तीचे नाव विशेष चर्चेत आले असून, तो  चौकातील “स्वीट होम” आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हप्ते गोळा करतो, व “आ_ब चधरी”यांना तिथून पोच होतात? व तिथून स्थानिक अधिकाऱ्याला जातात का?अशी माहिती समोर आली आहे. व वरिष्ठ कार्यालय हे पैसे स्थानिक गुन्हे शाखेतील काही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतात, का? असा गंभीर आरोपही होत आहे.

गुन्हे शाखेतील कर्मचारी “ज्ञान_श्वर क्षीरसा🌊र” याच्याकडे हे हप्ते “सा🌊र सो_वले उर्फ “मेजर” या” व्यक्तीमार्फत पोहोचवले जात असल्याचे समजते? “सा🌊र सोन_ल” हा पूर्वी सरकारी सेवेत होता, मात्र सध्या तो हप्त्यांचे व्यवहार सांभाळत असल्याचा दावा नागरिक आणि स्थानिक सूत्रांनी केला आहे? यावरून एकच स्पष्ट होते — या सर्व कारभारामागे वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात हप्ते गोळा करणे शक्यच नाही जर हे खरं असेल तर याची सखोल चौकशी झालीच पाहिजे नागरिकांमध्ये चर्चा..!

याचप्रमाणे बारामती नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागातील काही कर्मचारीही या व्यवहारात सहभागी आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली काही ठिकाणी पैसे घेतले जातात, अशी नागरिकांची तक्रार आहे.

नगरपरिषदेचे नाव या घडामोडीत प्रथमच समोर येत असल्याने आता नागरिक आणि स्थानिक सामाजिक संघटनांकडून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

भंगार व्यवसायाच्या माध्यमातून चालणारे हे बेकायदेशीर हप्ते, प्रशासनातील भ्रष्ट कर्मचारी आणि काही अधिकाऱ्यांचा संजोग उघड झाल्यास बारामतीच्या प्रशासनाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत संबंधित ठिकाणांची डिटेल्स आणि नावांसहित माहिती उघड करण्याचे संकेत स्थानिक जनआंदोलन कार्यकर्त्यांनी दिले आहेत.

एकंदरीत, “भंगार”चा व्यवसाय आता फक्त लोखंडाचा नव्हे तर भ्रष्टाचाराच्या साखळीचा विषय झाला आहे.


Translate »
error: Content is protected !!