ई-पेपरताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बारामतीत मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – उत्साह, शिस्त आणि प्रेरणेचा संगम..!


🔥MK NEWS36 

बारामती मॅरेथॉनमध्ये देशराज मीणा ठरले विजेते – सात वर्षांच्या आर्या टाकोणेचा जागतिक विक्रम..!

बारामती, दि. २ नोव्हेंबर – बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत १० किमी पुरुष गटात देशराज मीणा यांनी अव्वल क्रमांक पटकावला. ३० ते ३९ वर्षे वयोगटातील मीणा यांनी १० किमी अंतर फक्त ३५ मिनिटे ५ सेकंदात पूर्ण करत विजेतेपद आपल्या नावे केले.

१८ ते २९ वर्षे वयोगटात कुनाल जाधव (३६:३३) आणि गौरव पवार (३७:०८) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.

या स्पर्धेतील सर्वात ठळक आणि प्रेरणादायी क्षण ठरला तो नागपूर येथील केवळ सात वर्षांच्या कुमारी आर्या पंकज टाकोणे हिने ५ किमी धाव २५ मिनिटांत पूर्ण करत वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला. या कामगिरीबद्दल उपस्थितांकडून आर्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.

स्पर्धेत उपमुख्यमंत्री यांचे खासगी सचिव डॉ. अमर भडंगे, तसेच क्रीडा मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील आगरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.

समारोपप्रसंगी विजेत्या धावपटूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. बारामती शहरातील नागरिकांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे मॅरेथॉन स्पर्धेला जल्लोषमय वातावरण लाभले.


Translate »
error: Content is protected !!