ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

दौंडच्या सहकार चौकात दरोडा — १० तोळे सोनं आणि रोकड लंपास!


🔥MK NEWS 36 

भरवस्तीत दरोडा — १० तोळे सोनं आणि रोकड लंपास
दौंड प्रतिनिधी : कोमल सोनवणे

दौंड – शहराच्या मध्यवर्ती सहकार चौक परिसरात बंद सदनिकेवर दरोडा टाकून अज्ञात चोरट्यांनी जवळपास १० तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी अतुल शंकर काळे (वय ४७, रा. बाळकृष्ण प्लाझा, फ्लॅट क्र. ११, पाटील हॉस्पिटल शेजारी, सहकार चौक, दौंड) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १२.१५ या वेळेत घडली. फिर्यादी यांच्या बंद सदनिकेचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले दागिने व रोकड १,५०० रुपये असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

घटनेनंतर दौंड पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून तपास सुरू केला असून पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम पुढील तपास करीत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


Translate »
error: Content is protected !!