दौंड तालुक्यात आमदार राहुलदादा कुल यांच्या अध्यक्षतेखाली महसूल सेवा पंधरवड्याचा शुभारंभ..!
🔥MK NEWS 36
दौंड तालुक्यात महसूल सेवा पंधरवड्याचा शुभारंभ – ५०० हून अधिक नागरिकांना तत्काळ लाभ
दौंड (प्रतिनिधी) :
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (दि. १७ सप्टेंबर) आणि महात्मा गांधी जयंती (दि. २ ऑक्टोबर) यानिमित्त महसूल विभागाने दि. १७ सप्टेंबर २०२५ ते दि. २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “महसूल सेवा पंधरवडा” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याअनुषंगाने दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. राहुलदादा कुल यांच्या अध्यक्षतेखाली महसूल सेवा पंधरवड्याचा शुभारंभ सोहळा बोरीपार्टी, चौफुला (ता. दौंड) येथील श्री कृष्ण मंगल कार्यालयात पार पडला.

या कार्यक्रमात महसूल सेवा पंधरवडा दरम्यान देण्यात येणाऱ्या सेवा तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. यामध्ये विशेषतः दौंड तालुक्यातील सर्व गाव रस्ते, शेत रस्ते व पाणंद रस्त्यांना संकेतांक क्रमांक देऊन त्यांची नोंदणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यानुसार तालुक्यातील प्राथमिक स्तरावर एकूण १६ गावांचे GIS आधारित नकाशे (MAP) अनावरण करण्यात आले.
यावेळी महसूल विभागामार्फत खालील प्रमाणे सेवा व योजना लाभार्थ्यांना थेट देण्यात आल्या –
भटक्या व विमुक्त जातींना जातीचे दाखले – ५०
संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजनेत मंजूर लाभार्थी प्रमाणपत्रे – १२५
भामा आसखेड व पुनर्वसन शेरे कमो दाखले – १३४
पुनर्वसन भूखंड वाटप – २६
शिधापत्रिका वितरण – ३२
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात मदत विमा योजनेचे दाखले – ४ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ५०० हून अधिक नागरिकांना तत्काळ लाभ मिळाल्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




