बारामतीत तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून; दोघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल..!
🔥MK NEWS36
बारामतीत तरुणाचा दगडाने ठेचून खून; दोघांविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल..!
बारामती शहरात रविवारी रात्री थरारक घटना घडली असून लेंडीपट्टी येथील वेताळबाबा मैदानात २० वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 460/2025 अन्वये बीएनएस 103(1), 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत अविनाश उर्फ माउली धनंजय लोंढे (वय २०) याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मयताचे वडील धनंजय प्रभाकर लोंढे (वय ४३, व्यवसाय – चहाची हातगाडी, रा. मळद, शेंडेवस्ती, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास लेंडीपट्टी येथील वेताळबाबा मैदानाच्या मध्यभागी समिर इकबाल शेख (वय २५, रा. देवळे पार्क सोसायटी, मळद रोड, बारामती) आणि प्रथमेश राजेंद्र दळवी (वय २०, रा. जगताप मळा, खंडोबानगर, ईदगाहजवळ, बारामती) यांनी संगनमताने अविनाश याच्यावर हल्ला केला. शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोघांनी अविनाशच्या डोक्यात दगडाने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले, ज्यात त्याचा मृत्यू झाला, असा आरोप फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.१४ वाजता स्टेशन डायरी नंबर १६/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, दाखल अंमलदार म्हणून पो. हवा. शेख (बन २१२१) यांनी काम पाहिले आहे.
घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत.




