ई-पेपरक्राईमब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

भंगार गोदामाला पुन्हा आग; बेकायदेशीर धंद्यांना ‘भ्रष्ट संरक्षण’ मिळतेय का?


🔥MK NEWS36 

भंगार स्क्रॅप गोदामाला पुन्हा आग — बेकायदेशीर धंद्यांना ‘मौन संरक्षण’? नागरिकांची भीषण संतापाची लाट..!

(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)

बारामती|
शहरातील भंगाराच्या स्क्रॅप गोदामाला काल पुन्हा एकदा आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी या आगीपेक्षाही धगधगत असलेला प्रश्न अधिक गंभीर आहे—या बेकायदेशीर गोदामांना संरक्षण देणाऱ्या भ्रष्टाचारी यंत्रणेचा शेवट एखाद्याचा जीव गेल्यानंतरच होणार का?

स्थानिक नागरिकांचा संताप ओसंडून वाहत असून, लोकांचे थेट आरोप आहेत की महिन्याच्या ‘हप्त्या’च्या मोबदल्यात प्रशासनातील काही कर्मचारी एवढ्या खालच्या पातळीवर जात आहेत की जीवितहानी झाली तरी त्यांना फरक पडत नाही.

बेकायदेशीर गोदामांचा ‘फायर ट्रॅप’: ना सेफ्टी, ना नियम, ना तपासणी

या भागातील बहुतांश स्क्रॅप गोदामे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक बेकायदेशीर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे.
त्यात ना फायर सेफ्टी, ना कागदपत्रे, ना विमा… आणि तरीही कोणत्याही भीतीशिवाय व्यवसाय सुरू.

स्रोतांच्या माहितीनुसार,
✔ फायर एक्स्टिंग्विशर नाही
✔ वायरिंग बेकायदेशीर व धोकादायक
✔ ज्वलनशील मालाचा ढीग
✔ कामगारांची कोणतीही सुरक्षा

याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष चालू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

“हप्ता मिळाला की नियम आंधळे होतात” — नागरिकांचा प्रत्यक्ष आरोप

नागरिकांचा रोष स्पष्ट आहे:

> “येथील काही प्रशासकीय कर्मचारी बेकायदेशीर गोदामे चालू ठेवण्यासाठी दर महिना हप्ता घेतात. म्हणूनच हे आगीचे प्रकार कितीही झाले तरी कारवाई होत नाही. जीव गेला तरी यांना फरक पडत नाही.”

भंगारातील आग नेहमीच संशयास्पद असते, कारण बहुतांश घटनांमध्ये

ना FIR

ना पंचनामा

ना मालकावर कारवाई

ना गोदाम सील

हे वास्तव समोर येत आहे.

‘बातम्या येतात तेव्हा कारवाई, मग पुन्हा शांतता’ — नागरिकांचे निरीक्षण

गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी व स्थानिक पत्रकारांनी मुद्दाम बातम्यांची मालिका लावल्यावर काही दिवस प्रशासन हालचाल करते, पन नंतर…

सगळं पुन्हा जुनेच!

गोदामे पुन्हा सुरु,
सेफ्टी पुन्हा शून्य,
भ्रष्टाचार पुन्हा पूर्ववत.

या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण?’ — नागरिकांचा प्रश्न अधिक तीव्र..!

नागरिकांनी थेट बोट ठेवले आहे—
भ्रष्ट बाबू, भ्रष्ट कर्मचारी आणि त्यांना संरक्षण देणारे काही अधिकारी.

बेकायदेशीर गोदामे चालवणाऱ्यांपेक्षा
महिन्याला मिळणाऱ्या हप्त्यावर जगणाऱ्या प्रशासनातील दलालांना अधिक जबाबदार धरले जात आहे.

आता सखोल चौकशीची मागणी; नगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल होणार

स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की—

👉 या बेकायदेशीर गोदामांच्या पूर्ण सखोल चौकशीसाठी
👉 जबाबदार कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाईसाठी
👉 तसेच भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करण्यासाठी

नगरपालिका व पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली जाणार आहे.

या प्रकरणातील असली धागे कुणापर्यंत पोहोचतात, हे पाहणे आता सर्वांचे लक्ष वेधून ठेवणारे ठरणार आहे.


Translate »
error: Content is protected !!