“इंदापूरनंतर सुप्यातही ‘भिक मांगो आंदोलन’ची चिन्हं — पोलिसांवर थेट आरोप!”
🔥MK NEWS 36
सुपा पोलीस ठाण्यात “हप्त्यांचा” महापूर — नागरिकांचा रोष!
इंदापूरनंतर सुप्यातही ‘भिक मागो’ आंदोलनाची चिन्हे; बेकायदेशीर धंद्यांना पोलिसांचे वरदहस्त?
(प्रदीप गायकवाड, मुख्य संपादक MK NEWS 36)
सुपा —
सुपा पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. “इथे कायदा नाही, तर हप्ता चालतो!” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या तोंडी ऐकू येत आहे. कारण सुप्यातील पोलीस ठाण्यात हप्त्यांचा महापूर ओसंडून वाहतोय, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
गॅस रिफिलिंगसारखा ज्वलंत आणि जीवघेणा व्यवसाय बेकायदेशीरपणे पोलीस ठाण्याच्या आशीर्वादाने चालतोय, असं नागरिकांचं ठाम म्हणणं आहे. “हप्ते दिले की कायदा संपतो, आणि न दिले की गुन्हा दाखल होतो,” असा थेट आरोप लोकांनी केला आहे.
या संपूर्ण ‘व्यवसाय साम्राज्या’त काही पोलीस कर्मचारी वर आरोप आहे की जसे की रुपे_श , वाघ_मोड, लों&ढ, दर_कर आणि भाग्य_वं यांचा ‘मोलाचा वाटा’ असल्याचं नागरिकांमध्ये चर्चेचं केंद्रबिंदू आहे. “हे पाचशे रुपये द्या, बाकी मी पाहतो,” अशा स्टाईलने सर्व काही रुळावर असल्याचा आरोप होत आहे.
दारू, मटका, हॉटेल व्यवसाय, पत्त्यांचे क्लब, स्क्रॅप व्यापार, ट्रॅफिक नियमांच्या नावाखाली गाड्या अडवणे — हे सर्व बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम आणि राजरोसपणे चालू आहेत, आणि त्यामागे पोलीस ठाण्याचं छत्रछाया असल्याचं नागरिकांचं ठाम मत आहे.
याबद्दल नागरिक म्हणतात —
> “लोकांच्या जीवाशी खेळून स्वतःच्या घरभरणीचा धंदा सुरू आहे. इंदापूरनंतर आता सुप्यातही भिक मांगो आंदोलन करावं लागेल असं दिसतंय.”
सुप्यातील जनतेचा संयम आता सुटण्याच्या मार्गावर आहे. इंदापूरसारखंच सुप्यातही आंदोलनाचा नारा लवकरच उमटू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
“नावानिशी पोलखोल करणार!”
सुप्यातील काही पत्रकारांनी स्पष्ट सांगितलं आहे की, “लवकरच नावानिशी कोण किती घेतं, कोणत्या व्यवसायातून घेतं, आणि कुणाच्या छत्राखाली घेतं याचा पुराव्यानिशी खुलासा केला जाणार आहे.”
सुपा पोलीस ठाण्याभोवती आता संतापाचं वादळ घोंघावतंय, आणि “इंदापूरनंतर सुपा” हे आंदोलनाचं पुढचं रणांगण ठरण्याची चिन्हं स्पष्टपणे दिसत आहेत.




