ई-पेपरताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

प्रभाग 1, 2 आणि 6 मध्ये बसपाची ताकद दाखवली; भव्य मिरवणूक काढत अर्ज दाखल..!


🔥MK NEWS36 

दौंड नगरपरिषद निवडणूक : बहुजन समाज पार्टीचे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल..!

(सचिन आटोळे, दौंड प्रतिनिधी)

दौंड नगरपरिषद निवडणुकीचा ताप वाढत असताना बहुजन समाज पार्टीने (बसपा) सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाआधीच भव्य शक्ती प्रदर्शन करीत नगरसेवकांच्या उमेदवारी अर्जांची नोंदणी पूर्ण केली. शहरातून वाजतगाजत निघालेल्या मिरवणुकीमुळे वातावरणाला निवडणुकीची रंगत आली होती.

प्रभाग क्रमांक 1, 2 व 6 मध्ये मोठी चुरस असल्याने बसपाकडून दाखल होणाऱ्या उमेदवारांकडे शहरातील नागरिक आणि मतदारांचे विशेष लक्ष होते. कोणत्याही प्रकारची गर्दी किंवा गोंधळ होऊ नये म्हणून दोन दिवस आधीच उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अर्ज दाखल करण्यापूर्वी बसपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकातील पुतळ्यास अभिवादन करत हार अर्पण केले. त्यानंतर इतर महापुरुषांच्या पुतळ्यांनाही वंदन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. साधारण दुपारी बाराच्या सुमारास हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला.

प्रभाग 1 व 6 कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा—असा निर्धार बसपा कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. यासाठी त्यांनी आधीच प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून दोन ते तीन फेऱ्यांमध्ये घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला आहे. मतदारांच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न जाणून घेत त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न जोरदारपणे सुरू आहे.

प्रत्येक मतदाराशी प्रत्यक्ष भेट घेऊन “तुमची कामे प्राधान्याने करू” असे आश्वासन देत बसपाचे उमेदवार प्रचारयुद्ध मैदानात उतरले असून निवडणूक वातावरणात बसपाच्या सक्रियतेची जोरदार चर्चा सुरु आहे.


Translate »
error: Content is protected !!