ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक

एमडी प्रवेशासाठी 46 लाखांची फसवणूक – डॉक्टर भावांवर दौंड पोलिसांत गुन्हा दाखल..!


🔥MK NEWS 36 

दौंड : डॉक्टरकडून 46 लाखांची एमडी ॲडमिशन फसवणूक; दोन भावांवर गुन्हा दाखल

दौंड (प्रतिनिधी) : वैद्यकीय पदव्युत्तर (एम.डी. मेडिसिन) प्रवेश देतो असे सांगून तब्बल 46 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन भावाविरोधात दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संजीव केशव करंडे (वय 47, व्यवसाय – डॉक्टर, रा. समतानगर, दौंड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी डॉ. अक्षय देशमुख आणि त्यांचा भाऊ सागर देशमुख (रा. कात्रज, पुणे) या दोघांनी 21 डिसेंबर 2024 पासून 2 जानेवारी 2025 या कालावधीत विश्वास संपादन करून “एम.डी. मेडिसिन (पी.जी.) प्रवेश मिळवून देतो” असे सांगितले. त्यावरून फिर्यादीकडून वेळोवेळी एकूण 46 लाख रुपये घेतले, मात्र प्रवेश न मिळवून दिल्याने फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी भा.दं.वि. कलम 318(4), 316(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार पोलीस हवालदार चव्हाण यांच्या मार्फत नोंदविण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक उगले हे करत आहेत.

या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातील फसवणुकीच्या घटनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या “ॲडमिशन एजंट” किंवा मध्यस्थांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Translate »
error: Content is protected !!