ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बारामती बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट! कमिशन एजंटवर फसवणुकीचे गंभीर आरोप..!


🔥MK NEWS 36 

बारामती बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट! कमिशन एजंटवर गंभीर आरोप — शेतकऱ्यांची संतापजनक प्रतिक्रिया, कारवाईची मागणी तीव्र

(प्रदीप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS 36)

बारामती :
कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती — शेतकऱ्यांच्या हक्कांवर डाका टाकणाऱ्या काही कमिशन एजंटांच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे पुन्हा एकदा बाजार समिती चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. बारामतीच्या लाडक्या आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकहाती सत्तेखालील या बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल विक्रीदरम्यान फसवणूक होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

🔹 शेतकरी निलेश तावरे यांची फसवणूक..!

निलेश तावरे या शेतकऱ्याने अंदाजे ५०० किलो कोव्हाळा विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता. त्यातील काही माल थोरात कमिशन एजंट यांना दिला, ज्यांनी प्रामाणिकपणे २२७ किलो माल दाखवून योग्य मोबदला दिला. म्हणजे 6590 मात्र दुसऱ्या कमिशन एजंट प्रवीण सुदामराव भोईटे यांनी त्याच मालाचा फक्त ९७ किलो एवढाच हिशेब दाखवत फसवणूक केल्याचा आरोप आहे.

केवळ २ ते ३ हजार रुपयांचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे. जवळपास एक महिन्यापासून या शेतकऱ्याला न्याय मिळालेला नाही, उलट तो जबाब मागायला गेला असता त्याला दमदाटी, शिवीगाळ व धमक्या देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

🔹 शेतकरी संघटनांचा संताप..!

या घटनेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढे सरसावली आहे.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, तालुकाध्यक्ष बाबासाहेब झगडे, युवक अध्यक्ष विशाल भोईटे, खजिनदार नितीन घोळवे, राजेंद्र जाधव, गणेश गायकवाड यांनी एकत्र येत बाजार समितीच्या सचिवांना भेट दिली.
मात्र सुरुवातीला सचिवांनी उडवाउडवीची उत्तरे देत विषय टाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही संघटनेकडून करण्यात आला आहे.

नंतर संचालक मंडळाने शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकरी व संघटनांचा ठाम आग्रह राहिला —

> “प्रवीण भोईटे यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांचे परवाना (लायसन्स) रद्द झालेच पाहिजे.”

🔹 कायदेशीर बाजू..!

या प्रकरणात संबंधित कमिशन एजंटविरुद्ध खालील कलमांनुसार कारवाई होऊ शकते:

भारतीय दंड संहिता कलम ४०६ (विश्वासघात)

कलम ४०९ (विश्वस्ताचा अपहार)

कलम ४२० (फसवणूक)

तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम अंतर्गत Rule 57(7), 57(8), 60-61 आणि Section 36, 37 नुसार विक्रेत्याने व्यवहारानंतर ठराविक दिवसात पैसे व पावती देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याला विचारल्याशिवाय मालाचा विल्हेवाट लावणे किंवा लपविणे हे नियमानुसार दंडनीय गुन्हा ठरतो.

🔹 बारामतीतील शेतकऱ्यांचा आक्रोश..!

शेतकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे:

> “आम्ही जीव तोडून शेती करतो, बाजार समिती ही आमच्या विश्वासाची जागा असावी, पण इथे आमच्याच मालावर डल्ला मारला जातो. दादागिरी, लाचखोरी, आणि शेतकऱ्यांचा अपमान — हे आता थांबलेच पाहिजे!”

🔹 निष्कर्ष..!

बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत चालणारे हे प्रकार फक्त एका शेतकऱ्याचा नव्हे, तर संपूर्ण शेतकरी वर्गाचा आवाज आहेत. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात आली आहे.

📍टीप:
या संपूर्ण प्रकरणामुळे बारामती बाजार समितीतील शिस्त, पारदर्शकता व शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


Translate »
error: Content is protected !!