इंस्टाग्रामवर ओळख, भेटवस्तूंचा वापर! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; 23 वर्षीय नराधमावर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल…!
🔥MK NEWS 36
भीषण! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; बारामती शहरात खळबळ, नराधमावर गुन्हा दाखल..!
बारामती|प्रतिनिधी
बारामती शहरामध्ये एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गु.र. नं. 383/2025 नुसार, एप्रिल 2025 पासून ते 17/10/2025 पर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. फिर्यादी (व्यवसाय गृहिणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी (वय 23 वर्षे, रा. एमआयडीसी बारामती) याने इंस्टाग्रामवरून पीडित 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली.
ओळख वाढवण्यासाठी आरोपीने तिला चॉकलेट्स आणि वेगवेगळे गिफ्ट्स भेट दिले. पीडित मुलगी 13 वर्षांची अल्पवयीन आणि ढोर समाजाची आहे हे माहिती असूनही, आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर, पीडितेच्या राहत्या घरी आणि घराशेजारील शेडजवळ आरोपीने जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले, असे फिर्यादीत नमूद आहे.
या कलमांखाली गुन्हा दाखल
फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी 22/10/2025 रोजी गुन्हा दाखल केला असून, आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 69, 64(2)(एम), 65(1), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याचे (Atrocity Act) कलम 3(1)(r), 3(1)(w) तसेच पॉक्सो कायद्याचे (POCSO Act) कलम 4, 6, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे बारामती शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून, महिला पोलीस हवालदार खेडकर यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मा. उपविभागीय अधिकारी भट्टे, बारामती विभाग, बारामती हे करत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.




