ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“कर नियमित, पण सुविधा शून्य; मोरगावातील नागरिकांचा संताप उफाळला!


🔥MK NEWS 36 संपादकीय 

मोरगावात मूलभूत सुविधांचा बोंबा – पावसात रस्ता दलदल, ग्रामपंचायत कानाडोळ?

श्री क्षेत्र मोरगाव (गट क्र. 892) परिसरातील नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मोरगाव-जेजुरी रोडवरील ओमकार लोजींगसमोरचा रस्ता पावसाळ्यात अक्षरशः दलदल झाला असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. चिखल, घसरटपणा व खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.

येथील रहिवाशांच्या तक्रारीनुसार, श्री. दिपक शेठ ढोले यांनी केलेल्या प्लॉटिंगमध्ये सोळा ते सतरा घरे उभी आहेत. येथील नागरिक वर्षानुवर्षे घरपट्टी व पाणीपट्टी भरत असले तरी मूलभूत नागरी सुविधा अद्यापही नाहीत. रस्त्याविना सोसावा लागणारा त्रास, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटचा अभाव ही जळजळीत उदाहरणे आहेत.

RPI (A) पक्षाने नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज दिला. मात्र ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केले, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. “आम्ही कर भरतो, पण बदल्यात आम्हाला काहीच मिळत नाही. ग्रामपंचायत केवळ कागदोपत्री काम करत आहे,” असा सवाल नागरिकांनी केला.

दरम्यान, सरपंच सौ. अलका तावरे यांना रहिवाशांनी विनंती केली आहे की किमान रस्त्याचे काम तरी तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


Translate »
error: Content is protected !!