“जवानांचा सवाल – आम्ही सेवा देतो, मग पगारासाठी भीक का मागायची?”
🔥MK NEWS 36 संपादकीय
🛑 होमगार्ड विभागात भ्रष्टाचाराचा महास्फोट?
होमगार्ड विभागातील भ्रष्टाचाराचे थरारक किस्से एकामागोमाग एक उघडकीस येत आहेत? शासनाकडून मिळणारे पैसे खिशात घालून, जवानांचे आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण करण्याचा उद्योग काही मोजक्या अधिकाऱ्यांनी उभारला आहे का?

जवानांचे कमी दिवस भरलेले
जवानांचे म्हणणे आहे की —
बंदोबस्तासाठी काम केलेल्या दिवसांचे हिशेब मुद्दाम कमी दाखवले जातात. सुरुवातीला ३-४ दिवस दाखवून नंतर ७ दिवस भरले जातात. म्हणजेच थेट आर्थिक फसवणूक!

दिवस सात दिवस भरून आणलेले..
विधानसभेच्या बंदोबस्ताचे बिल अद्याप थकलेले, जवानांचे हजारो रुपये प्रलंबित.
१३०० रुपये रोज × ७ दिवस = ९१०० रुपये मिळाले तरी तेवढेच येण्याजाण्यात उडतात का?
परेडचे ७२० रुपये कधीही जवानांच्या खिशात पडलेच नाहीत ?
“रंगोटी कार्यालयासाठी” पाचशे-सातशे रुपये जबरदस्तीने वसूल केले जातात?
अगदी लाईट बिलसारख्या किरकोळ खर्चासाठीही जवानांकडून पैसे उकळले जातात.
2019 च्या परिपत्रकानुसार ड्रेस किटसाठीचे अनुदान आजतागायत मिळालेले नाही. शासनाकडून पैसा येतो, पण जवानांच्या हातात मात्र एक रुपया पडत नाही. हा पैसा कुठे जातो, हा मोठा प्रश्न आहे!
जवानांनी आता थेट बंड पुकारले आहे. सह्याची मोहीम सुरू झाली आहे. भ्रष्टाचाराच्या जनकाला पाठबळ देणारे वरिष्ठ-कनिष्ठ अधिकारी, तेजस साथीदार यांना फक्त निलंबित होईल का? व आणि निलंबित करून भागणार नाही, तर जमा केलेली मायाजाल मालमत्ता जप्त करून शासनाकडे जमा करावी, अशी मागणी केली जात आहे!
दरम्यान, काही अधिकारी मात्र “सादर राहणीमान, उच्च विचार” या टॅगलाइनमध्ये स्वतःला प्रामाणिक ठरवतात, पण प्रत्यक्षात गाड्या, फ्लॅट, बंगले उभारून पैशाचे साम्राज्य उभे करत आहेत का?
🔥 प्रामाणिक जवान मात्र साधा चहा प्यायलाही महाग आहेत? 🔥
आता सवाल एकच —
👉 हा भ्रष्टाचाराचा खेळ खरोखर थांबणार का?
👉 की फक्त “सराव” चालू राहून जवानांची पिळवणूकच सुरू राहणार?
✍️ हा स्फोटक भ्रष्टाचार थांबवला नाही तर जवानांच्या असंतोषाचा ज्वालामुखी फुटेल, हे नक्की!




