“दूध का दूध, पाणी का पाणी” – आरटीआय कार्यकर्त्यांचा ठाम पवित्रा
🔥MK NEWS 36
आरटीआय कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा – पुणे जिल्हा निवडणुकीत मत हेराफेरीचा संशय, निवडणूक आयोगाला विचारले जाणार प्रश्न
कोमल सोनवणे
दौंड प्रतिनिधी
दि. 24 ऑगस्ट 2025
पुणे जिल्ह्यात डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आता मतांच्या हेराफेरीचा संशय पुढे येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आरटीआय कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्याची तयारी केली आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान व त्यानंतर अनेक कार्यकर्ते व राजकीय पक्षातील नेत्यांनी निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार केला होता. याच पत्रव्यवहाराच्या प्रती (झेरॉक्स) मिळवण्यासाठी माहिती अधिकाराचा (RTI) वापर करून आयोगाकडे अधिकृतरीत्या माहिती मागवली जाणार आहे.

आरटीआय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोग हा देशाचा मुख्य स्तंभ असून त्याची निष्पक्ष प्रतिमा लोकांसमोर यावी, हे अत्यंत गरजेचे आहे. जर निवडणुकीत मतांची हेराफेरी झालेली नसेल, तर आयोगाकडून पारदर्शक उत्तर दिले गेले पाहिजे. त्यामुळे “दूध का दूध आणि पाणी का पाणी” असा खुलासा लोकांसमोर व्हावा, हीच कार्यकर्त्यांची मागणी आहे.
निवडणूक झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असोत किंवा सामान्य नागरिक, अनेकांनी आयोगाला तक्रारी व प्रश्न पत्राद्वारे नोंदवले होते. आता हे पत्रव्यवहार सर्वसामान्यांसमोर येणे गरजेचे असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.
आरटीआय कार्यकर्त्यांच्या या उपक्रमामुळे “सत्यमेव जयते – सत्य कधीच लपून राहत नाही” या घोषवाक्याची पुनरुज्जीवन होत असल्याची चर्चा होत आहे. येत्या काही दिवसांत या निवडणुकीत झालेल्या तक्रारी, पत्रव्यवहार आणि आयोगाचे उत्तर याबाबतचे सत्य समोर येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
👉 पुणे जिल्हा आता या निवडणूक हेराफेरी प्रकरणाच्या सत्यतेकडे डोळे लावून बसला आहे.




