ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

डॉल्बीमुक्त, पर्यावरणपूरक उत्सवासाठी दौंड तालुक्यात प्रशासन सज्ज


🔥MK NEWS 36

दौंड तालुक्यात शांतता समितीची बैठक संपन्न

सचिन आटोळे

दौंड (प्रतिनिधी) –
आगामी गणेशोत्सव तसेच इतर सण-समारंभांच्या पार्श्वभूमीवर दौंड तहसिल कार्यालयात दिनांक २६ ऑगस्ट रोजी शांतता व सुव्यवस्था विषयक बैठक पार पडली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी दौंड श्री. रेवणनाथ लबडे अध्यक्षस्थानी होते.

या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, तहसिलदार दौंड, दौंड व यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक, नगरपरिषद दौंडचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, महावितरण अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व गावांचे पोलीस पाटील आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान आगामी गणेशोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उत्सव काळात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी गावनिहाय कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देशही देण्यात आले.

यावेळी डॉल्बीमुक्त व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, उत्सव काळात उत्कृष्टपणे कार्य करणाऱ्या गणेश मंडळांपैकी तीन मंडळांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.


Translate »
error: Content is protected !!