ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

जिल्हा बँकेचा १०८ वा वर्धापन दिन साजरा; विद्यार्थ्यांना वह्या-खाऊ, ज्येष्ठांना वृक्षरोपे भेट


🔥MK NEWS 36

प्रतिनिधी

जिल्हा बँकेचा १०८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..!

रावणगाव (ता. दौंड): पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन रावणगाव शाखेत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवून ग्राहक, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व केक कापून करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिली तसेच खाऊचे वाटप करून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत ज्येष्ठ नागरिक आणि बँकेच्या विश्वासू ग्राहकांना स्मृतिचिन्ह म्हणून वृक्षरोपे देण्यात आली.

या प्रसंगी दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती उत्तम आटोळे, बाजार समितीचे संचालक गजीनाथ आटोळे, माजी सरपंच गेनदेव आटोळे, मळद पोसाईटीचे चेअरमन अशोक गायकवाड, रावणगाव विकास सोसायटीचे चेअरमन राजेंद्र आरोळे, नंदादेवी विकास सोसायटीच्या अध्यक्षा मनीषा गावडे, तसेच अशोक आटोळे, रमेश कोकणे, नितीन शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

बँकेचे विकास अधिकारी शिवाजी गरदडे, शाखा प्रमुख विट्ठल नांगरे, रोखपाल मंगेश खडके, लेखनिक अश्विनी गवंड, तसेच कर्मचारी तेजस फाजगे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

मान्यवरांनी बँकेच्या गेल्या १०८ वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेत बँक ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासात मोठी भूमिका बजावत असल्याचे नमूद केले. भविष्यात आणखी आधुनिक सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी बँक अधिकाऱ्यांनी दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, ग्राहक व गावकऱ्यांनी जिल्हा बँकेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Translate »
error: Content is protected !!