ई-पेपरसामाजिक

*‘‘बारामती शहरामध्ये संविधान दिन व स्वातंत्र्यसेनानी ह. टिपू सुलतान जयंती, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची संयुक्त जयंती उत्साहपुर्ण वातावरणामध्ये साजरी’’*


‘‘बारामती शहरामध्ये संविधान दिन व स्वातंत्र्यसेनानी ह. टिपू सुलतान जयंती, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची संयुक्त जयंती उत्साहपुर्ण वातावरणामध्ये साजरी’’

मे. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशाने मंगळवार दिनांक 24/12/2024 रोजी सायंकाळी बारामती शहरामध्ये संविधान दिन व स्वातंत्र्यसेनानी ह. टिपू सुलतान व भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची संयुक्त जयंती अतिशय उत्साहपुर्ण वातारवणामध्ये साजरी करण्यात आली.
सदर जयंतीवेळीस संविधानाची प्रतिकृती तसेच ह. टिपू सुलतान व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेंचे रथातून देशभक्तीपरगत व महापुरूषांच्या गीतांवरती वाजत-गाजत बारामती शहरातून मिरवणुक काढण्यात आली सदरवेळी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. जयंतीमध्ये सर्व जाती-धर्मातील नागरीक व तरूण वर्ग मोठ्या उत्साहाने सामील झाले होते. मिरवणुक गांधी चैक येथे येताच . धीरज लालबिगे भगवान विर गोगादेव निशाणा आखाडा अध्यक्ष व अध्यक्ष – मेहतर वाल्मिकी विकास परिषद तसेच अक्षय माने व कार्यकर्ते यांनी संविधान व महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून स्वागत केले. यानंतर भिगवण चैक याठिकाणी ब.स.पा. चे शहराध्यक्ष चंद्रकांत खरात व कार्यकर्ते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून स्वागत केले. तसेच इंदापूर चैक याठिकाणी श्री. सिध्दार्थ घाडगे, बंटी जगताप यांनीही मिरवणुकीचे स्वागत केले तर गुनवडी चैक याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे श्री. जितीन कवडे व सुमित सोनवणे तसेच कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
सदर जयंती पार पाडणेकरीता श्री. फैय्याज ईलाही शेख, जिल्हाध्यक्ष AIMIM पुणे जिल्हा, काळूराम चैधरी प्रदेश सचिव ब.स.पा., गणेश (भाईजी) सोनवणे माजी नगरसेवक बा.न.प., नवनाथ बल्लाळ माजी उपनगराध्यक्ष बा.न.प., सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते, गौतम (आप्पा) शिंदे, अशरद शेख, फरहान मुन्ना बागवान, अमीर शेख, अन्वर बागवान, अॅड. बाबाजान शेख, अॅड. बिलाल बागवान, वैभव जगताप, चेतनशेठ साळुंके, जावेद बागवान,हसन शेख ,व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले….


Translate »
error: Content is protected !!