ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

कुरकुंभ गणात पुन्हा एकच घोषणा घुमू लागली आहे — “एकच वादा… बबनदादा!”


🔥MK NEWS36 

— विशेष राजकीय प्रतिनिधी, सचिन आटोळे

कुरकुंभ गणात पुन्हा एकच घोषणा घुमू लागली आहे — “एकच वादा… बबनदादा!”
2002 ते 2007 या काळात विकासकामांच्या आघाडीवर भक्कम छाप पाडणारे बबन रणवरे आता पुन्हा पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. दोन दशकांनंतर या गणातील जनतेने स्वतः पुढाकार घेत बबनदादांना निवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरला आहे.

एम. के. न्यूजशी बोलताना बबन रणवरे म्हणाले,
“जनता होकार देईल तर मी अपक्ष म्हणूनही मैदानात उतरेन.”
त्यांच्या या वक्तव्यानंतर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
२००७ नंतर विकासकामाला ब्रेक; पुन्हा नेतृत्वाची गरज

रावणगाव, नंदादेवी, मळद, कोठडी, कुरकुंभ या प्रमुख गावांसाठी त्यांनी 2002-07 काळात भरीव कामे केली. परंतु त्यानंतर या गणातील विकासकामे गट-तटाच्या वादात अडकून गेल्याची खंत स्थानिक मतदार व्यक्त करतात.
“बबनदादांची नेतृत्वशैली वेगळी होती. कोणावर अन्याय नको, अशी त्यांची भूमिका होती. आता पुन्हा तशीच गरज भासते,” असे एका वरिष्ठ नागरिकाने सांगितले.

घरकुल योजनेत राजकारण – लोक त्रस्त

या परिसरात घरकुलाच्या वाटपात राजकीय हस्तक्षेप वाढल्याची नाराजी जनतेत जाणवते.
“सध्या कोणताही राजकीय पुढारी पुढे येत नाही, समस्या ऐकून घेण्यासही तयार नाही,” असे नागरिक सांगतात. त्यामुळे “बबनदादा पुन्हा सक्रिय झाले पाहिजेत,” अशी मागणी वाढत आहे.

एकच वादा… पुन्हा जीवंत!

2002 साली मतदारांच्या तोंडून उमटणारी घोषणा “एकच वादा… बबनदादा!” आता पुन्हा ऐकू येऊ लागली आहे.
मतदारांच्या भावना, विकासातील अडथळे आणि नेतृत्वाची उणीव यामुळे बबन रणवरे यांच्या पुनरागमनाची चर्चा वेग घेऊ लागली आहे.

कुरकुंभ गणात राजकीय समीकरणे कशी बदलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Translate »
error: Content is protected !!