ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक

२६/११ शहीदांना दौंडमध्ये अभिवादन; महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे श्रद्धांजली कार्यक्रम..!


🔥MK NEWS36

दौंड प्रतिनिधी :
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना दौंड तालुका व शहर, जनकर्तव्य सामाजिक युवा संघटना आणि मार्शल आर्ट बॉक्सिंग-कराटे ट्रेनिंग स्कूल दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने २६/११ मुंबई आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना अभिवादन करत श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी कार्यालयीन अधीक्षक गट 19 व गट 7 चे मिलिंद निकम तसेच बलगट क्रमांक ५ चे असिस्टंट कमांडर सरोदे साहेब, वेल्फेअर अधिकारी पी. आय. जायभाय साहेब आणि एडवोकेट अनिकेत मिसाळ यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात असिस्टंट कमांडर सरोदे साहेब यांनी संविधान शपथ घेत सर्वांना संवैधानिक मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले. उपस्थितांनी २६/११ च्या हल्ल्यात राष्ट्रासाठी हौतात्म्य स्वीकारलेल्या शूर वीरांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक माननीय राहुल अर्जुनराव दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. दौंड तालुका अध्यक्ष हिरालाल साळवे यांच्या नेतृत्वात तालुका उपाध्यक्ष धनराज गायकवाड, तालुका सचिव कृष्णा शिवशरण, तालुका संघटक विजय मोरे, संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहराध्यक्ष अमोल आवारे, शहर उपाध्यक्ष दिनेश वाल्मिकी, सभासद आबा पवार, सनी फाळके, पाटस शाखा अध्यक्ष वैभव दुबे, किरण चोरमले, रवींद्र हरिदास यांनी कार्यभार सांभाळला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहीद भगतसिंग गोल्ड राऊंड रिक्षा स्टँड, हॉटेल शिवाई, तसेच दौंड-बारामती वाहतूक संघ यांचे विशेष सहकार्य लाभले.

राष्ट्रीय भावना, एकता आणि शहीदांच्या शौर्याचा स्मरणार्थ घेतलेल्या या उपक्रमामुळे परिसरात देशभक्तीचा जागरमय माहोल निर्माण झाला.


Translate »
error: Content is protected !!