बारामतीत शरद पवार गटाची ‘युवा कार्ड’ खेळी; शहर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी ओमकार खोत यांच्या खांद्यावर!
🔥MK NEWS36
बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहर कार्याध्यक्षपदी ओमकार खोत यांची निवड
बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आपल्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. बारामती शहराच्या राजकारणात सक्रीय असलेल्या ओमकार विकास खोत यांची बारामती शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे अधिकृत पत्र बारामती विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते योगेंद्र पवार यांच्या हस्ते ओमकार खोत यांना प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✅युवा नेतृत्वाला संधी..!
ओमकार खोत हे गेल्या अनेक वर्षांपासून बारामती शहरात सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रीय आहेत. त्यांची कामाची पद्धत आणि जनसंपर्क लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. शरद पवार यांच्या विचारांची पाठराखण करत शहरात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणे, हे त्यांच्यापुढील मुख्य उद्दिष्ट असणार आहे.
💢योगेंद्र पवार यांचे मार्गदर्शन..!
निवडीचे पत्र देताना योगेंद्र पवार यांनी ओमकार खोत यांचे अभिनंदन केले. “शहरातील तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी आणि सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ओमकार खोत यांचे नेतृत्व प्रभावी ठरेल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
🙏ओमकार खोत यांची प्रतिक्रिया..!
आपल्या निवडीनंतर बोलताना ओमकार खोत म्हणाले, “आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, खा. सुप्रियाताई सुळे आणि युवा नेते योगेंद्र पवार यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला मी पूर्णपणे सार्थ ठरवीन. बारामती शहरात पक्षाची ध्येयधोरणे घराघरांत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”
या निवडीबद्दल बारामतीतील विविध स्तरांतून ओमकार खोत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




