क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“माळेगाव प्रकरणाने पोलिसांचा मुखवटा फाडला – लाचखोरीमुळे न्याय ठप्प का?”


🔥MK NEWS 36 संपादकीय 

📰 बारामतीत गुन्हा, लाखोंची चोरी – तरीही आरोपी मोकाट! पोलिसांवर गंभीर संशय, ‘लाचखोरी’च्या चर्चेने खळबळ..!

बारामती :
माळेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं व कलम 232/2025 बी. एन. एस 303 (2), 3 (5) प्रमाणे दाखल झालेला 12 लाख 55 हजार 100 रुपयांचा थरारक चोरीचा गुन्हा आता अधिकच रहस्यमय होत चालला आहे. फिर्यादी सोयल बशीर इनामदार यांची दागदागिने व रोख रक्कम घरातून लंपास झाली असताना, आरोपींची नावं, ठिकाणं आणि सर्व माहिती पोलिसांकडे असूनही आजतागायत एकाही आरोपीला अटक का नाही?

यावरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, “लाखो रुपयांची लाच घेतल्याची चर्चा सत्य काय? पोलिसांमध्ये गाजतेय, म्हणूनच आरोपींना वाचविण्यात आलंय का?” असा थेट प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

👉 गंभीर संशय :

लाखोंची चोरी करूनही आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत.

फिर्यादीकडून सर्व पुरावे असूनही तपासाचा गतीशून्य वेग.

पोलिसांनी आरोपींवर कारवाई टाळल्याचे गावकऱ्यांचे आरोप?

“लाचखोरीमुळे प्रकरण दाबलं गेलं का?” अशी चर्चा जनतेत चांगलीच चिघळली आहे.

👉 जनतेचे प्रश्न :

1. जर गुन्हा खरोखर दाखल झाला असेल तर अटक का झाली नाही?

2. आरोपींना पोलीस का जपून ठेवत आहेत?

3. लाखोंची लाच घेऊन आरोपींना मोकळं सोडलं का?

4. सर्वसामान्य जनतेचा न्याय कुठे गेला?

📌 हा प्रकार म्हणजे पोलिसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह!
गुन्हा नोंदवून फाईलमध्ये गोळा-धुळा जमा करायचा, आरोपींना सोडून द्यायचं आणि त्यातून ‘खिसा गरम’ करायचा – हा प्रकार असेल तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा?

⚡ या प्रकरणाने बारामतीत प्रचंड खळबळ माजली असून नागरिक आता थेट उच्च पोलिस अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी करू लागले आहेत.


Translate »
error: Content is protected !!