ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“आरोग्य यंत्रणेचा खेळखंडोबा! काटी-सुरवडमध्ये निष्काळजीपणाचा कळस”


🔥MK NEWS36 

🟥 धक्कादायक वास्तव! आरोग्य केंद्रावर कुलूप, दारात ‘रक्षक’ कुत्रे — रुग्णांचा जीव धोक्यात

प्रतिनिधी : सागर समिंदर | इंदापूर तालुका

इंदापूर तालुक्यातील काटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील भीषण निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला असून, “आरोग्य सेवा” ही केवळ कागदोपत्रीच असल्याचे संतापजनक चित्र उघड झाले आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान केंद्रात एकही डॉक्टर, नर्स किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, केंद्र पूर्णपणे उघडे ठेवण्यात आले असून, मुख्य दरवाजासमोर चक्क कुत्रे बसवून ‘राखण’ केली जात असल्याचे विचित्र आणि धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले.

हे दृश्य पाहून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ज्या ठिकाणी रुग्णांना उपचार मिळायला हवेत, त्या ठिकाणी कुत्र्यांची उपस्थिती दिसणे ही प्रशासनाच्या बेफिकिरीची पराकाष्ठा असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. आरोग्य केंद्र म्हणजे रुग्णांसाठी जीवनदायी ठिकाण; मात्र येथे परिस्थिती पूर्णपणे उलट असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, सुरवड येथील उपकेंद्राची परिस्थितीही तितकीच गंभीर आहे. हे उपकेंद्र पूर्णपणे बंद असून, येथेही एकही डॉक्टर, नर्स किंवा कर्मचारी हजर नसल्याचे आढळले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या मते, “वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. अधिकारी केवळ कागदोपत्री काम दाखवतात, पण प्रत्यक्षात केंद्रे ओस पडलेली आहेत.” असा संतप्त सूर उमटत आहे.

प्रश्न असा निर्माण होतो की, या गंभीर प्रकाराची जबाबदारी नेमकी कोण घेणार? जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या निष्काळजी यंत्रणेवर कठोर कारवाई कधी होणार? संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा नागरिकांचा संताप आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

👉 निष्कर्ष :

इंदापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, प्रशासनाने तात्काळ जागे होणे अत्यावश्यक आहे. नाहीतर ‘आरोग्य केंद्र’ ही संकल्पना फक्त नावापुरती उरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


Translate »
error: Content is protected !!