MK NEWS 36 चा इम्पॅक्ट! झारगडवाडीत बेकायदेशीर गॅस साठ्यावर गुन्हा — पण मोठे पुरवठादार अजूनही मोकळे!
🔥MK NEWS 36
🚨 गॅस रिफिलिंगवर MK NEWS 36 चा इम्पॅक्ट : झारगडवाडीत बेकायदेशीर गॅस साठ्यावर गुन्हा दाखल — पण मोठे मासे अजूनही सुरक्षित!
बारामती (दि. ८ ऑक्टोबर २०२५) —
गेल्या काही दिवसांपासून MK NEWS 36 ने सातत्याने उघड केलेल्या बेकायदेशीर गॅस रिफिलिंग आणि अवैध गॅस विक्रीच्या व्यवहारावर अखेर प्रशासन हललं असून, झारगडवाडी येथे एक किरकोळ गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, ही केवळ छोटी कारवाई असून खरे सूत्रधार अजूनही मोकळेच फिरत आहेत, असा गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९/२०२५ नोंदवण्यात आला आहे.
जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७, तसेच लिक्विड पेट्रोलियम गॅस (Regulation of Supply and Distribution) Order २००० चे कलम ४(२), व भारतीय दंड संहिता कलम २८७, २८८ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
फिर्याद पुरवठा निरीक्षक तीतीक्षा घनश्याम बारापत्रे (वय ३२) यांनी दिली असून आरोपी म्हणून श्रीमती मनीषा राजेंद्र सोनलकर (रा. झारगडवाडी, बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत पोलिसांनी सुमारे ₹४८,००० किमतीच्या १६ भरलेल्या गॅस टाक्या आणि ३ रिकाम्या एचपी सिलेंडर असा मुद्देमाल जप्त केला आहे.
मात्र खरी धक्कादायक बाब म्हणजे —
👉 या किरकोळ विक्रेत्याला इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस टाक्या कोणत्या एचपी गॅस एजन्सीकडून मिळतात?
👉 एका व्यक्तीला नऊ-दहा टाक्या एकाचवेळी कशा दिल्या जातात?
👉 हे टाकी वाहनांद्वारे खाजगी पद्धतीने बेकायदेशीर ठिकाणी पोचवले जातात, तरी पुरवठा विभाग गप्प का आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.
MK NEWS 36 कडे ठोस पुरावे आहेत की एचपी गॅस एजन्सीकडूनच या टाक्या एकाच व्यक्तीला पुरवल्या जात आहेत. त्यामुळे हा गुन्हा फक्त किरकोळ महिलेकडे थांबवून मोठ्या “मासे”ना वाचवण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
तपास सध्या सुरु असला तरी या प्रकरणात संबंधित गॅस एजन्सीचा परवाना रद्द होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारण — जीवनावश्यक वस्तूंशी खेळ म्हणजे थेट सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ!
MK NEWS 36 या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील आणि मोठ्या गॅस एजन्सीपर्यंत तपास पोहोचला नाही, तर पुढील टप्प्यात मोठा उलगडा करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
📍मुख्य संपादक : प्रदीप गायकवाड, MK NEWS 36
“किरकोळ गुन्हे दाखल झाले, पण मुख्य पुरवठादार मोकळे — न्यायाचा सिलेंडर अजूनही अर्धवट!” 🔥




