ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बारामती आरटीओ ऑफिस की ट्रक पार्किंग? — सरकारी जागेत खाजगी वाहनांचा कब्जा!


🔥MK NEWS 36 

 आरटीओ ऑफिसमध्ये पार्किंगचा गोंधळ — भ्रष्टाचाराचा वास की कायद्यानाचा भंग?

– प्रदीप गायकवाड, मुख्य संपादक, MK NEWS36

बारामती :
बारामती आरटीओ कार्यालय परिसरात नेमकं काय सुरू आहे, हा नागरिकांना पडलेला गंभीर प्रश्न बनला आहे. आरटीओ कार्यालयाच्या आवारात आणि परिसरात खासगी ड्रायव्हिंग स्कूलच्या बस, ट्रक आणि अन्य खाजगी वाहनांचे मोठ्या प्रमाणात पार्किंग सुरू असून, ही वाहने सरकारी जागेत दिवस-रात्र उभी असतात. हे वाहन अधिकृतरीत्या जमा केलेले आहेत का, की काही आर्थिक देवाणघेवाणीमुळे येथे ठेवले जात आहेत, असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.

नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये सर्वात मोठा मुद्दा म्हणजे — जर ही वाहने दंड भरून किंवा कारवाई करून जमा केली असतील, तर त्याचे अधिकृत नोंदवहीत उल्लेख असावा. परंतु, कोणत्याही नोंदीशिवाय सरकारी जागेत खाजगी वाहनांचे पार्किंग हे स्पष्टपणे अनधिकृत वापर ठरते.

ट्रक स्कूल ड्रायव्हिंग ट्रक पार्किंग केले वाहने व घाणीचे साम्राज्य..

कायद्यानुसार लागू तरतुदी:

भारतीय दंड संहिता (BNS 2023) – कलम 441/447

मोटर वाहन अधिनियम 1988 – कलम 117 व 122 : दंडनीय गुन्हा.

याशिवाय स्थानिक पोलीस, नगरपरिषद आणि आरटीओ प्रशासन यांना अशा वाहनांवर कारवाई करण्याचा संपूर्ण अधिकार आहे.

दरम्यान, MK NEWS36 कडे यासंदर्भातील व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहे. त्यामुळे जर कारवाई झाली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवरच चौकशी आणि जबाबदारी ठरवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

एजंटांचा सुळसुळाट, ऑफलाईन प्रक्रियेमुळे वाढलेला भ्रष्टाचार, आणि कार्यालय परिसरातील घाणीचे साम्राज्य — हे सर्व मिळून बारामती आरटीओ कार्यालयाची प्रतिमा धोक्यात आणत आहेत. सुरुवातीला पारदर्शकतेसाठी सुरू केलेली ही यंत्रणा आता गैरव्यवहाराचे केंद्र बनते आहे का, हा सर्वांचा प्रश्न आहे.

“सरकारी जागेत खाजगी वाहन पार्किंगला परवानगी कोणाने दिली? कारवाई कोण करणार?” — या नागरिकांच्या प्रश्नाला आता आरटीओ विभाग आणि स्थानिक प्रशासन उत्तर देणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


Translate »
error: Content is protected !!