ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

भंगार हप्ते प्रकरण — बारामतीत हक्काने चालतो बेकायदेशीर धंदा?


🔥MK NEWS 36 

🔥 भंगारच्या नावाखाली चालणारं हप्त्यांचं साम्राज्य! — बारामतीत प्रशासनाला मिळणारे लाखो रुपयांचे ‘हफ्ते’ उघडकीस!

(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक, MK NEWS36)

बारामती |
बारामती शहरात भंगार (स्क्रॅप) व्यवसाय राजरोसपणे चालू आहे — आणि हा धंदा एवढ्या निर्धोकपणे कसा चालतो, हे पाहिलं तर मागचा ‘हप्त्यांचा’ मोठा खेळ समोर येतो. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांपासून ते वरिष्ठ कार्यालयांपर्यंत पैशाची रांगोळी किती खोलवर गेली आहे, हे ऐकून सामान्य नागरिक थक्क होतात.

💰 लाखो रुपयांचा हप्त्यांचा खेळ?

शहरात 14 ते 15 मोठ्या भंगार दुकानांवर साधा हिशेब लावला, तरी महिन्याला ३ ते ३.५ लाख रुपयांपर्यंतचा हप्ता स्थानिक प्रशासनाला दिला जातो, अशी माहिती समोर आली आहे खरे आहे का?
प्रत्येक दुकानाकडून साधारणतः ३० हजार रुपये ‘नियमित हप्ता’ घेतला जातो — आणि यानंतरही कोणी त्यांना विचारत नाही.

🏢 उपविभागीय कार्यालयाचे ‘दर’ वेगळे!

या साखळीत पुढचं पाऊल म्हणजे उपविभागीय कार्यालय. येथे १५ ते ३० हजार रुपयांपर्यंतचे हप्ते जातात? सरासरी हिशोब धरला, तर हे दरमहा २.५ ते ३ लाख रुपयांपर्यंत पोहोचतात. विशेष म्हणजे, हद्द बदलली की ‘दर’ बदलतात!
शहर, ग्रामीण आणि तालुका – या तिन्ही ठिकाणी स्वतंत्र ‘हप्त्याचे दर’ ठरलेले आहेत.

🔍 एलसीबी आणि बीटचे खेळ?

स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि बीट अधिकारी हे या साखळीतील महत्त्वाचे दुवे आहेत. शहरात आणि ग्रामीण भागात विभागणी करून, “माझ्या हद्दीतलं तू दे”, “तुझ्या हद्दीतलं मी देतो” — असा हप्त्यांचा समजुतीचा व्यवहार केला जातो. शेवटी पैसे फिरतात ते त्याच अधिकाऱ्यांकडेच, फक्त मार्ग वेगळे!

🧾 नोटीस केवळ दिखावा..

बीएनएस कलम 168 अंतर्गत काही ‘नोटिसा’ काढल्या जातात, पण त्यांचा उपयोग फक्त धमकीपुरता. प्रत्यक्ष तपास, चौकशी किंवा कारवाई फारच क्वचित होते. लहान दुकानदारांवर कारवाई करून मोठ्यांकडून हप्ता उकळणे — ही पद्धत आता जणू ठरलेलीच आहे.

🧠 प्रशासनातील “आबा” व “मेजर”

स्थानिक प्रशासनातील “आबा” यांच्याकडे विचारल्याशिवाय काहीच होत नाही, असे नागरिक सांगतात. तर एलसीबीतील “मेजर” (हा माणूस हा ना प्रशासनाचा आहे का?) नावाचा गोळा करणारा एजंट, हा ५०० रुपयांपासून २५ हजारांपर्यंत ‘गोळा’ करतो. तोच पुढे साखळीतील मोठ्यांना पैसे पोहोचवतो.
या संपूर्ण रचनेत प्रत्येकाला आपला वाटा ठरलेला आहे — आणि हाच कारण भंगारचा बेकायदेशीर व्यवसाय राजरोसपणे सुरु राहतो.

⚖️ नागरिकांचा ज्वलंत प्रश्न

शहराच्या गजबजलेल्या भागात, नागरिकांच्या डोक्यावर धोक्याचे गोडाऊन तयार होत आहेत. त्यातून आग लागल्यास, प्रदूषण वाढल्यास, जीवितहानी झाली तरी कोणी जबाबदार नाही. नागरिक विचारतात —

> “कायद्याच्या नावावर धमकी, पण हप्त्याच्या नावावर गप्प का?”

या हप्ते खोरांचे आपण सविस्तर एक एक प्रकारे कसे हप्ते गोळा होतात याचा सविस्तर आपण मांडणी मांडणार आहोत..!


Translate »
error: Content is protected !!