ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी संघटित लढा देणार – गौरव अहिवळे..!


🔥MK NEWS36

बारामतीत जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचा पदनियुक्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न
बारामती : येथील जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचा पदनियुक्ती कार्यक्रम संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात बारामती शहर कार्यकारिणीची नवी पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली.
यामध्ये बारामती शहर अध्यक्षपदी आकाश शिंदे, उपाध्यक्षपदी विजय म्हस्के, कार्याध्यक्षपदी निखिल सरोदे, सरचिटणीसपदी सुरज वाडेकर, संघटकपदी ऋषिकेश तोरणे, सहकार्याध्यक्षपदी अनिकेत धालपे, संपर्कप्रमुखपदी योगेश तोरणे तर सह संघटकपदी ओम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी सांगितले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला संघटन करण्याचा अधिकार दिला आहे. कंत्राटी कामगारांच्या हक्क व अधिकारांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघ संघटितपणे लढा देत राहील. कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघ कायम सक्रिय राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नव-नियुक्त शहर अध्यक्ष आकाश शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कामगारांच्या हक्कांसाठी गौरव अहिवळे सातत्याने लढत आहेत. त्यांच्यासोबत आम्ही सर्व कामगार ठामपणे उभे आहोत. अध्यक्षपदाची जबाबदारी मला दिल्याबद्दल मी कृतज्ञ असून ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन कामगार संघाचे सदस्य मारुती सोनवणे, मनोज खरात व अक्षय सरोदे यांनी केले होते. तर कार्यक्रमाच्या शेवटी मनोज लोंढे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.


Translate »
error: Content is protected !!