शिरूर ते बारामती – होमगार्ड जवानांचा एकच सवाल, भ्रष्टाचाराचे जनक कोण?
🔥MK NEWS 36 संपादकीय
होमगार्ड विभाग – भ्रष्टाचाराचं दुसरं घरच?
(बारामतीनंतर शिरूर तालुक्यातही सुरु झाली होमगार्ड समादेशकांच्या कारभाराची चर्चा!)
होमगार्ड विभाग म्हटलं की आता भ्रष्टाचाराचं दुसरं घरच म्हणावं का? असा प्रश्न थेट जवानांनाच पडू लागला आहे. आतापर्यंत बारामती तालुक्यात होमगार्ड विभागातील एक ना अनेक भानगडी व घोटाळ्यांची प्रकरणं प्रकाशात आली होती. पण आता शिरूर तालुक्यातही समादेशकांच्या भ्रष्ट कारभारामुळे होमगार्ड जवानांच्या संतापाचा उद्रेक होऊ लागला आहे.

शिरूर चे समादेशक बसण्याची पद्धत ऑफिसमध्ये अशीच असते का?
येरवडा जेल बंदोबस्त – ठराविकांची मक्तेदारी!
होमगार्ड जवानांच्या तक्रारीनुसार, येरवडा जेलसारख्या महत्त्वाच्या बंदोबस्तासाठी कायम ठराविक चेहऱ्यांचीच नेमणूक केली जाते? बाकीच्या जवानांना मात्र कोरेगाव भीमा, पुणे गणपती अशा बाहेरच्या बंदोबस्तासाठी ढकललं जातं. म्हणजेच जवळच्या व ओळखीच्या लोकांनाच सोन्याच्या ताटातलं बंदोबस्त, बाकीच्या जवानांना टांगावर ठेवण्याची पद्धत सुरू आहे.
किटचा घोटाळा – 2019 परिपत्रकाचे पैसे गायब!
२०१९ मध्ये आलेल्या परिपत्रकानुसार होमगार्ड किटसाठी अडीच हजार रुपये आकारले गेले. जवानांच्या मते हे पैसे एकदाच जमा झाले, पण त्याचा हिशोब आजतागायत कुठेच नाही? हा पैसा कुठे गेला? कोणी खाल्ला, याचा मागमूस नाही. म्हणजेच किट घोटाळाही या समादेशकांच्या खिशात गेला का?असं जवानांचं म्हणणं आहे.
वरिष्ठांची थेट साथ?
जवानांचा ठाम आरोप आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार एकट्याने होणं शक्यच नाही. वरिष्ठांचा हात नसता तर असा उघडपणे ‘ठराविकांचा बंदोबस्त, ठराविकांचा पेमेंट’ हा धंदा सुरु होऊच शकत नाही. त्यामुळे फक्त समादेशक नव्हे तर वरिष्ठ लिपिक, अधिकारी व त्यांचे साथीदार यांचा यात थेट सहभाग असल्याचं जवानांचं म्हणणं आहे मग आहे का?
न्यायासाठी आंदोलनं – पण भ्रष्टाचाराचं जाळं वाढतंच!
एका बाजूला होमगार्ड जवान न्याय मिळवण्यासाठी आंदोलनं करत आहेत, तर दुसरीकडे समादेशक व त्यांचे लाडके मंडळी ठराविक बंदोबस्तावरच पाय रोवून बसले आहेत. बंदोबस्त, पेमेंट, किट – सगळंच ठराविक मंडळींमध्येच फिरत आहे. बाकी जवान मात्र बोंबलतायत.
जवानांचा सवाल – भ्रष्टाचाराचे जनक कोण?
शिरूर असो, बारामती असो किंवा महाराष्ट्रातलं कोणतंही ठिकाण असो, प्रत्येक ठिकाणी एकच चित्र दिसतं – होमगार्ड विभाग भ्रष्टाचाराच्या दलदलीत बुडालेला आहे. याला जबाबदार नेमका कोण? समादेशक? की वरिष्ठांचं आशीर्वाद घेतलेले ‘भ्रष्टाचाराचे जनक’? हा सवाल आता प्रत्येक जवान विचारत आहे.




