ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“बारामतीकरांचा दिलासा : MK NEWS 36 न्यूजच्या बातमीचा थेट परिणाम, रस्त्याचे काम मार्गी”


MK NEWS 36 IMPACT

“MK NEWS 36 न्यूजचा थेट परिणाम : सातव चौक–तांदळवाडी रोड कामाला गती, ठेकेदाराने घेतली धावपळ”

बारामती : सातव चौक ते तांदळवाडी हा महत्वाचा वर्दळीचा मार्ग दीर्घकाळ रखडला होता. खड्डेमय रस्ता, धुळीचे साम्राज्य आणि सतत होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. या संदर्भात MK NEWS 36 न्यूजने दोन दिवसांपूर्वी ठळकपणे बातमी प्रकाशित केली होती.

 

या बातमीचा प्रशासन व ठेकेदार यांच्यावर थेट परिणाम झाला असून, काम तातडीने सुरू झाले आहे. रोड दुरुस्तीसाठी ठेकेदाराने यंत्रसामग्री, रोलर, डांबर व कामगारांची तातडीने नेमणूक केली आहे. सध्या रस्त्याचे खड्डे बुजवणे, समतल करणे आणि दुरुस्तीची प्रक्रिया जोमाने सुरू आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये या घडामोडींमुळे समाधानाची भावना निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांनी सांगितले की, “MK NEWS 36 न्यूजने आवाज उठवला नसता तर हे काम अजून महिन्यांपर्यंत रखडले असते. आमच्या प्रश्नाला योग्य न्याय मिळवून दिल्याबद्दल आम्ही MK NEWS 36 न्यूजचे आभारी आहोत.”

दरम्यान, सातव चौक ते तांदळवाडी रोड हा बारामती शहराला ग्रामीण भागाशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या कामामुळे हजारो वाहनधारक व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

MK NEWS 36 न्यूजचा आवाज केवळ कागदावर न थांबता प्रत्यक्ष कृतीत उतरत आहे. या बातमीमुळे चॅनलची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता आणखी बळकट झाली आहे.


Translate »
error: Content is protected !!