निरवांगीत आंबेडकर–फुले जयंती उत्साहात; ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीची खंत?
🔥MK NEWS36
निरवांगीत आंबेडकर–फुले जयंती उत्साहात; ग्रामसेवक अनुपस्थितीची खंत
सागर समिंदर, प्रतिनिधी(इंदापूर व माळशिरस)
निरवांगी : निरवांगी ग्रामपंचायत कार्यालयात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त संयुक्त कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने करण्यात आली. ग्राम महसूल अधिकारी मा. अविनाश खोकले तसेच सरपंच/प्रशासक सौ. सुरेखाताई चांगदेव गुरव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना हारपुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी पोलीस पाटील मारुती रासकर, माजी सरपंच आदिनाथ कांबळे, माजी उपसरपंच दत्तात्रय नारायण पोळ पाटील, माजी सरपंच वसंत कांबळे, माजी उपसरपंच पांडुरंग पोटफोडे, ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी सदस्य गोपाळ रासकर, पांडुरंग रेडेकर, निवृत्ती पेडकर, सोमनाथ पाटोळे, विकास कांबळे, कुलकर्णी मॅडम, सूर्यवंशी मॅडम, वैभव राज जाधव, महेश रोकडे, बापू करे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष चांगदेव शंकर गुरव, कर्मचारी मोहन पाटोळे, सोमनाथ हिंगाणे व पांडुरंग पवार यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
कार्यक्रमादरम्यान महामानवांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि सर्वसमावेशक समाज घडविण्यासाठी दोन्ही महान नेत्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे यावेळी वक्त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमात शासन व जिल्हा परिषदेकडून नियुक्त ग्रामसेवक अधिकारी अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. सार्वजनिक कार्यक्रमांप्रती प्रशासनाची ही उदासीनता खेदजनक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
एकूणच, ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला; मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची खंत कायम राहिली.




