बारामती-पाटस पालखी मार्गावर पुन्हा अपघात; दोन दुचाकी एकमेकांना धडकून दोघांचा जागीच मृत्यू
सुपा प्रतिनिधी.
बारामती – पाटस पालखी महामार्ग पुन्हा एकदा दोन मोटरसायकल एकमेकांना समोरासमोर धडक….
बारामती-पाटस रस्त्यावरील जराडवाडी येथे दोन मोटरसायकल समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मागील आठवड्यात याच महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला होता, त्यानंतर आज पुन्हा अपघाताची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
शरद दत्तात्रय मोरे (वय ३६, रा. सोनवडी सुपा ता. बारामती) आणि ज्ञानेश्वर बबन वलेकर (वय ४२, रा. दहीगाव ता. माळशिरस जि. सोलापूर) अशी या अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज रविवार दि. २० जुलै रोजी दुपारी ०४:१५ वाजण्याच्या सुमारास बारामती-पाटस पालखी मार्गावरून शरद मोरे हे स्प्लेंडर दुचाकीवरून ( एम एच ४२ व्ही ३२१९) बारामतीकडे निघाले होते. तर ज्ञानेश्वर वलेकर हे आपल्या पत्नीसह एक्टिवा दुचाकीवरून ( एमएच १४ जेजी ९२०६) बारामतीकडून पाटस च्या दिशेने निघाले..
जराडवाडी गावाच्या हद्दीतील या दोन्ही मोटरसायकल समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये शरद मोरे आणि ज्ञानेश्वर वलेकर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर वलेकर यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी अक्कामाई ज्ञानेश्वर वलेकर (वय ३९) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
मागील आठवड्यात याच मार्गावरील शिर्सुफळ फाटा येथे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा अपघात होऊन दोघांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे…
आव्हान:..
MK NEWS 36.. चे आव्हान आहे की माणसांनी मोकळा रोड दिसला म्हणून वाहने जास्त वेगाने चालू नये
वेळ पोहोचण्यासाठी वेळेच्या अगोदर निघावे.. आपली कुणीतरी घरी वाट बघत आहे याचं भान ठेवून गाडी चालवावी..




