क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

गोवंश तस्करीचा प्रयत्न उधळला; मांडवगण पोलिसांची धडाकेबाज कारवाई, चार गाईंची सुटका..!


🔥MK NEWS 36 

गोवंश तस्करीचा प्रयत्न उधळला; मांडवगण पोलिसांची धडाकेबाज कारवाई — चार गाईंची सुटका, एक मृत
अहिरेश्वर जगताप | प्रतिनिधी

शिरूर (प्रतिनिधी): धाराशिव येथे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोवंश तस्करीचा प्रयत्न मांडवगण पोलिसांनी गोरक्षकांच्या सहकार्याने उधळून लावला आहे. या कारवाईत चार गाईंची सुटका करण्यात आली असून, दुर्दैवाने एका गाईचा मृत्यू झाला आहे.

ही कारवाई शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास राहू–मांडवगण मार्गावर करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एमएच २३ एयू ००४३ या पिकअप वाहनातून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने नागरगाव फाट्याजवळ सापळा रचला.

तपासणीदरम्यान वाहनाच्या हौद्यात चार गाई बांधलेल्या अवस्थेत आढळल्या, त्यापैकी एक गाय मृत होती. वाहन चालक सोहम टिळे (रा. राहू, ता. दौंड) याने चौकशीत गाईंना उस्मानाबाद येथे कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली, तर त्याच्यासोबत असलेला सराईत गोतस्कर ओमकार दशरथ सायकर (रा. राहू) हा अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

मांडवगण पोलिसांनी वाहन आणि गाई ताब्यात घेत महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. वाचवलेल्या गाईंना बोरमलनाथ गोशाळा, केडगाव चौफुला येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

या कारवाईत गोरक्षक गौरव सारवाड, मंगेश चिमकर, विकास शेंडगे, अभि फासगे, संकल्प पाटोळे आणि रुद्राप लवटे यांनी मोलाची भूमिका बजावली.

मानद प्राणी कल्याण अधिकारी अहिरेश्वर जगताप यांनी पोलिसांच्या तत्परतेचे आणि गोरक्षकांच्या जागरूकतेचे कौतुक करत म्हटले की, “गोरक्षकांच्या सक्रिय सहभागामुळेच गोवंशाची सुटका शक्य झाली. समाजातील प्रत्येक नागरिकाने अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरुद्ध जागरूक राहिले पाहिजे.”

मांडवगण पोलिसांची ही धडाकेबाज आणि वेळेवर केलेली कारवाई स्थानिकांतून कौतुकास पात्र ठरली आहे.


Translate »
error: Content is protected !!