ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

अजित पवारांचा ‘परिवार’ कुणासाठी? जनतेसाठी की केमिकल लॉबीसाठी?


🔥MK NEWS36 

कटफळ केमिकल कंपनी रोड प्रकरण: ड्रम बदलले का? पाण्याचे ड्रम कसे आले? अधिकारी गप्प का? बारामती ‘परिवार’ की काही मोजके कार्यकर्ते?

(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)

बारामती | MK NEWS36
बारामती येथील कटफळ परिसरातील केमिकल कंपनी रोड प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर व संशयास्पद वळण घेत आहे. नागरिकांमध्ये सध्या सुरू असलेली चर्चा ही केवळ अफवा आहे की त्यामागे ठोस वास्तव आहे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. कारण या प्रकरणात समोर येत असलेले मुद्दे केवळ धक्कादायक नाहीत, तर प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत.
या केमिकल कंपनीमध्ये वापरले जाणारे काही केमिकल्स बेकायदेशीर व मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचे आरोप नागरिक व जाणकारांकडून सातत्याने केले जात आहेत. विशेष म्हणजे या केमिकल्सचे सप्लायर्स, परवाने, वाहतूक आणि साठवणूक—या सगळ्या बाबी नियमांच्या चौकटीत आहेत का, यावर आजतागायत कोणतेही स्पष्ट उत्तर प्रशासनाकडून दिलेले नाही.
२० केमिकल ड्रम गायब? पाण्याचे ड्रम कसे दिसले?
या प्रकरणातील सर्वात गंभीर व संशयास्पद मुद्दा म्हणजे केमिकलचे २० ड्रम बदलून त्या ठिकाणी पाण्याचे ड्रम दाखवण्यात आल्याचा आरोप.
दुपारी केवळ नावापुरत्या पंचनाम्यासाठी गेलेले अधिकारी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत त्याच ठिकाणी थांबले होते, अशी माहिती समोर येत आहे.
मग या वेळेत नेमकं काय घडलं?
केमिकलचे ड्रम काढून पाण्याचे ड्रम कोणी व कशाच्या आदेशावर ठेवले?
मूळ केमिकल ड्रम कुठे शिफ्ट करण्यात आले?
कोणत्या वाहनातून, कोणाच्या उपस्थितीत आणि कुठल्या ठिकाणी हे ड्रम हलवण्यात आले?
पंचनाम्यात नोंद असलेले ड्रम आणि प्रत्यक्षात सापडलेले ड्रम यात फरक आहे का?
हे प्रश्न आज बारामतीतील प्रत्येक सजग नागरिक विचारत आहे.
सर्व माहिती असूनही अधिकारी मौन का?
या सगळ्या गंभीर बाबी समोर येऊनही संबंधित अधिकारी वर्ग इतका गप्प का आहे?
ही शांतता निष्काळजीपणाची आहे की जाणीवपूर्वक ठेवलेली मौनधारण?
जर या प्रकरणात काहीच गैर नसेल, तर प्रशासन स्पष्टपणे समोर येऊन माहिती का देत नाही?
आणि जर गैरप्रकार झाला असेल, तर त्यावर कारवाई का होत नाही?
‘बारामती माझा परिवार’—पण परिवार कोणाचा?
या संपूर्ण प्रकरणामुळे एक मोठा राजकीय व नैतिक प्रश्न उपस्थित होत आहे.
बारामतीला नेहमीच “माझा परिवार” म्हणणारे नेते अजित पवार यांनी खरोखरच या परिवाराला वाऱ्यावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे का?
एका जवळच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी जर सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि जीव धोक्यात घातले जात असतील, तर हा परिवारवाद नेमका कुणासाठी आहे?
कार्यकर्त्याचा पैसा महत्त्वाचा की बारामतीतील सामान्य कुटुंबांचे प्राण?
सखोल चौकशीची ठाम मागणी..!
MK NEWS36 मार्फत आम्ही ठामपणे मागणी करतो की—
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी झाली पाहिजे
केमिकल ड्रम शिफ्ट प्रकरणाची सीसीटीव्ही, वाहन नोंदी, पंचनामे सार्वजनिक झाले पाहिजेत
नियमबाह्य कृत्यात सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे
आम्ही येत्या काळात..!
👉 ठळक मुद्दे,
👉 ड्रम कुठे शिफ्ट झाले याबाबत थेट प्रश्न,
👉 जबाबदार व्यक्तींची नावे व भूमिका
हे सर्व जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वाचत राहा…
MK NEWS36 — प्रश्न विचारतोय, कारण बारामती महत्त्वाची आहे.


Translate »
error: Content is protected !!