ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मोठी कारवाई: बारामतीत अवैध गोवंश कत्तलखान्यावर छापा; ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त!


🔥MK NEWS36 

बारामतीत बेकायदेशीर गोवंश कत्तलखान्यावर छापा; तिघांवर गुन्हा दाखल

बारामती:

बारामती तालुक्यातील मेडद आणि नेपतवळण परिसरात बेकायदेशीररीत्या गोवंशाची कत्तल होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून सुमारे ५५,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल आणि गोवंश जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दिनांक १७ मे रोजी सकाळी ७:०० च्या सुमारास गोरक्षक वैभव सुनील थोरात आणि त्यांचे सहकारी (वेदांत दीक्षित, प्रणय वाघमारे, किरण कांबळे, आदित्य भोसले, विराज अवधूते) हे नेपतवळण गावच्या हद्दीत अवैध गोवंश वाहतुकीच्या माहितीवरून पाळत ठेवून होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाची पिकअप संशयास्पदरीत्या वेगाने जाताना दिसली.

गोरक्षकांनी पाठलाग केला असता, मेढद हद्दीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळल्या. शेडची पाहणी केली असता, तिथे लोखंडी सळईचे हुक, रक्ताने माखलेला सिमेंटचा कोबा आणि रक्ताचे डाग साफ करणारा एक इसम मिळून आला.

पोलिस कारवाई आणि जप्त मुद्देमाल

घटनेचे गांभीर्य ओळखून गोरक्षकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी आणि पंचांच्या उपस्थितीत पंचनामा केला. यावेळी घटनास्थळावरून:

दोन पांढऱ्या रंगाच्या खिल्लारी देशी गाई (अंदाजे वय ५ ते ६ वर्षे).

इतर १० ते ११ गाई असा एकूण ५५,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींची नावे

याप्रकरणी पोलिसांनी खालील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:

१. बापू कोंडीबा ठोंबरे (रा.मेडद, बारामती) – घटनास्थळी रक्ताचे डाग पुसताना मिळून आला.

२. अक्षय उर्फ बबलू विजय भागाव (रा. मेडद) – शेडचा मालक.

३. बिलाल कुरेशी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही).

कायदेशीर कारवाई..!

या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार थोरात (बि. नं. २२६९) आणि तपास अंमलदार पोलीस हवालदार मोहोळे (बि. नं. १९०१) करत आहेत. आरोपींविरुद्ध BNS २०२३ च्या कलम २३८, ३२५, ३(५) तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम ११(१)(h), ११(१)(I) आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्याच्या कलम ५ब, ५क, ९ व ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती परिसरात अशा प्रकारे अवैध कत्तलखाने सुरू असल्यामुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणाची व्याप्ती तपासण्यास सुरुवात केली आहे.


Translate »
error: Content is protected !!