बारामतीत सह्याद्री सोशल फाउंडेशनतर्फे ‘चला, मतदार यादीत आपले नाव नोंदवूया’ उपक्रम राबविण्यास सुरुवात..
बारामतीत सह्याद्री सोशल फाउंडेशनतर्फे ‘चला, मतदार यादीत आपले नाव नोंदवूया’ उपक्रम राबविण्यास सुरुवात..
बारामती /प्रतिनिधी– लोकशाही प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी सह्याद्री सोशल फाउंडेशन (NGO), बारामती यांच्या वतीने ‘चला, मतदार यादीत आपले नाव नोंदवूया’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
संभाजी गुलाब माने, अध्यक्ष, सह्याद्री सोशल फाउंडेशन यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम शुक्रवार ते शनिवार, सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत राबविला जात आहे.
उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना मतदार यादीतील विविध फॉर्म्सची माहिती देणे व त्यांना योग्य मार्गदर्शन करून मदत करणे.
✅ फॉर्म संदर्भ माहिती :
1. फॉर्म क्रमांक 6 – नवीन मतदार नोंदणीसाठी
2. फॉर्म क्रमांक 7 – मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी
3. फॉर्म क्रमांक 8 – मतदार यादीतील नाव/माहिती दुरुस्तीसाठी
4. फॉर्म क्रमांक 8A – मतदार यादीतील नाव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी
🔹 उपक्रमाचे वैशिष्ट्ये :
नागरिकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन
स्वयंसेवकांमार्फत अर्ज भरून देण्यासाठी मदत.
महाविद्यालये, शाळा, वसाहती व सार्वजनिक ठिकाणी जनजागृती
नवमतदार, स्थलांतरित नागरिक व दुरुस्ती इच्छुकांसाठी विशेष सुविधा
संभाजी माने यांनी सांगितले की, “लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवले पाहिजे. नागरिकांना योग्य माहिती आणि मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
हा उपक्रम बारामती शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत असून, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
…येताना डॉक्युमेंट चे झेरॉक्स घेऊन येणे अत्यंत आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
1.) पासपोर्ट साईज फोटो 2.) ओळखपत्र (पन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, आधार कार्ड इ.पैकी १)
3.) रहिवासी पुरावा (वीज बील, टॅक्स पावती, पासपोर्ट, गॅस पावती, बँक पासबुक इ. पैकी १)
संपर्क कार्यालय शॉप नं.1 सह्याद्री आयकॉन पाटस रिंग रोड बारामती जिल्हा पुणे
M no. 9822449306.




