ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

७७ वर्षांची परंपरा कायम – मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती..!


🔥MK NEWS 36

केडगाव परिसरात संत सेना महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी..

📰 केडगाव;

 –विनोद शेलार/ प्रतिनिधी

बोरी पारधी (केडगाव परिसर) येथे संत सेना महाराजांची पुण्यतिथी भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा पुण्यतिथीचे ७७ वे वर्ष असून या निमित्ताने बोरी पारधी परिसरातील नाभिक समाजाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 

सकाळी मंगळ वादनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, अभिषेक व महाआरती पार पाडल्यानंतर भजन, कीर्तन आणि प्रवचनाचे आयोजन झाले. यावेळी मोठ्या संख्येने नाभिक समाजासह इतर समाजातील नागरिकही उपस्थित राहिले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनोज जाधव होते. तर रवी पंडित, प्रताप दळवी, सुरज निढाळकर, शिवतेज निराळकर, किरण पंडित, अक्षय मोरे या पदाधिकाऱ्यांसह अनेक युवक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन पुण्यतिथीचे आयोजन भव्य स्वरूपात केले.

पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बोरी पारधी परिसरातील तसेच आसपासच्या जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास प्रतिसाद दिला.

संपूर्ण बोरी पारधी गाव भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाले होते. उपस्थित मान्यवर व समाजातील कार्यकर्त्यांनी संतांच्या कार्याचा गौरव करताना भक्ती, सेवा आणि ऐक्याची परंपरा पुढे नेण्याचे आवाहन केले.

👉 संत सेना महाराजांची पुण्यतिथी गेली सात दशकांपेक्षा अधिक काळ सातत्याने साजरी होत असून ग्रामस्थांच्या जीवनाचा अविभाज्य भाग ठरली आहे.


Translate »
error: Content is protected !!