ई-पेपरताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

जंगची कन्या दुर्गादेवी जगदाळे राजकीय रणांगणात दाखल..!


🔥MK NEWS36 

जंगची कन्या दुर्गादेवी जगदाळे राजकीय रणांगणात दाखल..!

दौंडच्या नगराध्यक्ष पदासाठी पाच जणींसोबत सज्ज

सचिन आटोळे
(राजकीय विशेष प्रतिनिधी)

दौंड नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांनी राजकीय वर्तुळात जोरदार एन्ट्री घेतली आहे. माजी आमदारांची नात आणि माजी नगराध्यक्षांची कन्या असल्याने राजकीय वारसा लाभलेल्या दुर्गादेवी यांचे आगमन दौंडच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या दुर्गादेवी यांनी “दौंडचा विकासाचा नकाशा बदलण्याची” तयारी सुरु केली असून, आपल्या चुलते व राष्ट्रवादीचे प्रभावी नेते तसेच दौंड साखर कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांच्या सोबत शहरातील विविध प्रभागांत घरोघरी भेटी देत मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत. तरुण, उत्साही आणि अविवाहित असल्याने “वेळ देऊ शकणारी उमेदवार” म्हणून मतदारांचा त्यांच्याकडून अपेक्षेचा सूर वाढताना दिसत आहे.

शहरातील सुमारे पन्नास हजारांहून अधिक मतदारांपुढे थेट जनतेतून निवडणूक लढवण्याचे आव्हान दुर्गादेवींच्या समोर आहे. मागासवर्गीयांची साडेबारा हजार, ओबीसी, मुस्लिम मतदारांचे समीकरण हेही या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. कुणबी–मराठा समाजातील उमेदवार असल्याने ओबीसी आणि बारा बलुती समाजाचा पाठिंबा कितपत मिळतो याची उत्सुकता आहे.

दुर्गादेवींचा अनुभव कमी असला तरी त्यांच्या घरातील अनुभवी राजकीय मंडळी मार्गदर्शनासाठी सोबत असल्याने त्यांची मोहीम सुबकपणे पुढे नेली जात आहे. नगरसेवक उमेदवारांचे सहकार्यही या निवडणुकीतील मोठा घटक मानला जात आहे. प्रभागातील उमेदवारांनी स्वतःसोबत नगराध्यक्ष पदासाठीही मतदान मागितले, तरच आघाडी मिळू शकते. अन्यथा निकालावर अनिश्चिततेचे सावट राहणार आहे.

सध्या दुर्गादेवी जगदाळे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, दौंड शहरातील मतदार त्यांना कितपत पसंती देतात हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.


Translate »
error: Content is protected !!