क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

डिजिटल मटका, चौकात पावत्या आणि हफ्तेखोरीचा सुळसुळाट; इंदापूर पोलिसांची भूमिका संशयात?


🔥MK NEWS36 

**इंदापूर तालुका : शेतीप्रधान ओळख की मटक्याचे अड्डे?

(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)
राजरोस मटका व्यवसाय, लाखोंचे हप्ते आणि पोलिसी मौनावर प्रश्नचिन्ह..!
इंदापूर तालुका म्हटलं की डोळ्यासमोर हिरवीगार शेती, कष्टकरी शेतकरी आणि परिश्रमाची संस्कृती उभी राहते. मात्र सध्याची वास्तव परिस्थिती पाहिली तर या शेतीप्रधान तालुक्याची ओळख हळूहळू मटक्याच्या अड्ड्यांनी गिळंकृत होत असल्याचे भयावह चित्र समोर येत आहे.
आज इंदापूर तालुक्यात मटका व्यवसाय राजरोसपणे, निर्भयपणे आणि खुलेआम सुरू आहे. चौकाचौकात पावत्या फाडल्या जात आहेत, तर काही ठिकाणी तर हायटेक पद्धतीने – मोबाईल, मेल, डिजिटल सिस्टीमद्वारे मटका चालवला जातोय.
हे सगळं सुरू असताना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एकच प्रश्न घोंघावत आहे —
👉 हे सगळं पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय शक्य आहे का?
तीन-चार मटका मालक, लाखोंचे हप्ते – पैसा जातो कुणाच्या खिशात?
मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यात तीन ते चार प्रमुख मटका मालक सक्रिय असून प्रत्येक  मालकाकडून लाखो रुपयांचे हप्ते नियमितपणे वसूल केले जात असल्याची चर्चा आहे.
हा पैसा नेमका कोण गोळा करतो?
👉 स्थानिक दलाल?
👉 भ्रष्ट कर्मचारी?
👉 की यामागे एखादी मोठी सिस्टीम कार्यरत आहे?
नागरिकांमध्ये उघड चर्चा आहे की प्रत्येक मार्कसाठी ठराविक “हफ्ता गोळा करणारे” कर्मचारी आहेत, आणि त्यामुळेच हा अवैध व्यवसाय इतक्या निर्भयपणे चालू आहे.
नवीन PI येऊनही परिस्थिती जैसे थे?
इंदापूरला नवीन पोलीस निरीक्षक (PI) येऊनही मटका व्यवसायावर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही, ही बाब अधिकच संशयास्पद ठरत आहे.
जर पोलीस प्रशासन खरोखरच कडक असेल, तर
👉 चौकात पावत्या कशा फाडल्या जातात?
👉 डिजिटल मटका इतक्या मोकळेपणाने कसा चालतो?
👉 कारवाई फक्त किरकोळ खेळाडूंवरच का?
आंदोलनाशिवाय पर्याय नाही का?
मटका व्यवसायामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत, युवक व्यसनाधीन होत आहेत, घराघरात आर्थिक वाद वाढत आहेत.
अशा परिस्थितीत आता नागरिक विचारत आहेत —
👉 प्रशासन झोपेत आहे का?
👉 पोलिसी कारवाई फक्त कागदावरच आहे का?
👉 न्याय मिळवण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरावं लागणार का?
लवकरच चित्रांसह, नावांसहित मोठा खुलासा!
जर एवढ्या उघडपणे हा अवैध धंदा चालू असेल, तर त्यामागे कोण आहेत, कोण हप्ते घेतात, कोण पाठबळ देतं — याचा पर्दाफाश होणं अपरिहार्य आहे.
येणाऱ्या काळात , नावांसहित मटका .

व्यवसाय कसा चालतो, कोणते “तीन मालक” सक्रिय आहेत, आणि कोणते कर्मचारी हप्ते गोळा करतात — हे सर्व जनतेसमोर आणणार आहोत.
इंदापूर तालुक्याची ओळख शेतीप्रधान राहणार की मटका-प्रधान?
हा प्रश्न आता प्रशासनासमोर नाही, तर जनतेच्या संयमाच्या कसोटीवर उभा आहे.


Translate »
error: Content is protected !!