ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बदली होतात अधिकारी, पण मटका थांबत नाही! इंदापूरमागील काळं सत्य उघड होणार?


🔥MK NEWS36 

🔴 इंदापूर तालुक्यात मटका-वाळू माफियांचा उच्छाद : या नावांभोवती फिरणारा काळा व्यवसाय, प्रशासनाचे अर्थपूर्ण मौन कोणासाठी?

(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)

इंदापूर तालुका म्हटला की शेती, शेतकरी आणि कष्टकरी जनतेचा परिसर अशी ओळख असताना आज मात्र या तालुक्याची ओळख मटका व बेकायदेशीर वाळू व्यवसायाच्या अड्ड्यांमुळे काळवंडत चालली आहे.
विशेष म्हणजे सु_स मkरे, शि_दे पठ_ण आणि ना भो_ग ही तीन-चार नावे आज संपूर्ण इंदापूर तालुक्यात मटका व्यवसायाच्या केंद्रस्थानी चर्चेत आहेत.
➡️ खरा प्रश्न असा आहे की, या लोकांचा नक्की पाठीराखा कोण?
➡️ प्रशासन एवढे डोळे झाकून का बसले आहे?
➡️ गोरगरिबांचे पैसे लुटणाऱ्यांना समाजात मान-प्रतिष्ठा कशी मिळते?
❓ राजरोसपणे चौकात टप, पण कारवाई शून्य?
राजूरपणे चौक, निमगाव केतकी, वडापुरी, इंदापूर शहर – तालुक्यातील प्रत्येक भागात मटका व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे नागरिक सांगतात.
ना चिठ्ठी, ना आकडे फळ्यावर – नव्या हायटेक पद्धतीने मटका चालतो, ही बाब अधिक गंभीर आहे.
यासाठी तालुका विभागून वेगवेगळे “मालक” नेमले गेले असल्याचीही चर्चा आहे.
💰 लाखोंचे हप्ते, पण कारवाई कुठे?
तीन ते चार मार्क करून प्रत्येकाकडून लाखोंचे हप्ते घेतले जात असल्याची चर्चा असूनही पोलिस यंत्रणा, महसूल प्रशासन आणि संबंधित विभाग पूर्णपणे निष्क्रिय का?
हे सगळे प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय शक्य आहे का? असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
🕵️‍♂️ भ्रष्ट कर्मचारी कोण?
या बेकायदेशीर व्यवसायाला काही भ्रष्टाचारी कर्मचारी संरक्षण देत आहेत का?
पोलीस निरीक्षक, कर्मचारी, महसूल यंत्रणा – सर्वांच्या “आशीर्वादाने”च हा धंदा सुरू आहे का?
नागरिकांमध्ये चर्चा आहे की, पूर्वी बदली झालेल्या अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होते, मात्र बदलीनंतरही परिस्थितीत काहीही सुधारणा झालेली नाही.
🏗️ मटका नव्हे तर वाळूचाही ‘बाप’ इंदापूर?
मटका व्यवसायासोबतच इंदापूर तालुक्यातील वाळू व्यवसाय सर्वात मोठा असल्याचे बोलले जात आहे.
नदी, ओढे, घाट – सर्वत्र बेकायदेशीर उत्खनन सुरू असताना हे नेमकं कोणाच्या आशीर्वादाने?
यामागेही तेच चेहरे, तीच यंत्रणा आणि तेच अर्थकारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
🔥 येणाऱ्या काळात मोठा स्फोट?
सूत्रांच्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाचा शंभर टक्के छडा लावण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात केला जाणार आहे.
मटका, वाळू, हप्ते, संरक्षण देणारे अधिकारी आणि राजकीय आशीर्वाद – सर्व नावे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
⚠️ प्रशासनाला थेट इशारा..!
आज जर प्रशासन गप्प बसले, तर उद्या या काळ्या व्यवसायाचा विळखा संपूर्ण तालुक्याला गिळंकृत करेल.
गोरगरिबांचे कष्टाचे पैसे लुटणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास नागरिकांचा विश्वास कायदा-व्यवस्थेवरून पूर्णपणे उडेल, हे मात्र नक्की.
🛑 प्रश्न कायम आहे –
इंदापूर तालुक्यात मटका आणि वाळू माफियांचा खरा “बॉस” कोण?
आणि प्रशासन कधी जागे होणार?


Translate »
error: Content is protected !!