महाराष्ट्र बॉईज संघटनेची राज्यस्तरीय बैठक गाजली — पोलिस व त्यांच्या पाल्यांसाठी नवी दिशा..!
🔥MK NEWS36
राज्यस्तरीय बैठक गाजवली — पोलिसांच्या मुलांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा
दौंड |प्रतिनिधी: महाराष्ट्र बॉईज संघटनेतर्फे राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राहुल अर्जुनराव दुबाले (सदस्य, महाराष्ट्र शासन गृह विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित राहून विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीत दौंड तालुका सचिव कृष्णा शिवशरण, शहर अध्यक्ष अमोल आवारे, स्वर उपाध्यक्ष दिनेश वाल्मिकी, विजय मोरे, नितीन ठोंबरे, तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना दौंड तालुका अध्यक्ष हिरालाल साळवे व तालुका उपाध्यक्ष धनराज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पोलीस कर्मचारी व त्यांच्या पाल्यांना शिक्षण, नोकरी, आरोग्य तसेच सामाजिक स्तरावर भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यांचे मार्गदर्शन घेऊन योग्य तो तोडगा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
हिरालाल साळवे यांनी या प्रसंगी पोलिसांच्या मुलांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर सविस्तर विवेचन केले. त्यांनी सांगितले की, “पोलिस कर्मचारी समाजरक्षणासाठी २४ तास तत्पर असतात, परंतु त्यांच्या कुटुंबीयांना अनेक समस्या भेडसावतात. या समस्यांवर संघटनेमार्फत ठोस उपाययोजना केली जाणार आहे.”
या राज्यस्तरीय बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी संघटनेच्या भावी योजनांबद्दलही चर्चा केली. पोलिसांच्या मुलांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरे, शैक्षणिक मदत योजना व क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचे ठरवण्यात आले.
या बैठकीला उपस्थित सर्व मान्यवरांनी एकमुखाने असे मत व्यक्त केले की, “पोलिस दल व त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी महाराष्ट्र बॉईज संघटना ठोस पावले उचलणार असून, समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे.”




