क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

तुमची जातच तशी, किती जणांसोबत झोपलात, की लेस्बियन आहात? कोथरुड पोलीस ठाण्यात मुलींच्या छळाचा आरोप.?.


MK NEWS 36/प्रतिनिधी;

कोथरुड पोलीस ठाण्यात दलित मुलींचा छळ झाल्याचा आरोप, पोलिसांकडून जातीवाचक शिवीगाळ अन् मारहाण? छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणात चौकशीवेळी हा प्रकार घडला…

पुणे प्रतिनिधी: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरुन मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून या तीन मुलींकडे एक दिवसासाठी राहायला आली होती. ती तरुणी हरवल्याची तक्रार ही संभाजीनगरमध्ये होती. पोलीस या संभाजी नगरच्या मुलीचा मोबाईल ट्रॅक करत कोथरुडपर्यंत  पोहोचले. त्यावेळी या संभाजीनगरच्या मुलीचं लोकेशन कोथरुडमध्ये आढळळं. त्यांनी या तीन मुलींच्या फ्लॅटवर जाऊन चौकशी केली. यानंतर पोलिसांनी या तिघींना ताब्यात घेऊन कोथरुड पोलीस ठाण्यात नेले. येथील रिमांड रुममध्ये पोलिसांनी या तिन्ही मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे…

कोथरुड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रेमा पाटील आणि छत्रपती संभाजीनगर  पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कामटे यांनी या तिन्ही मुलींना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप झाला आहे. श्वेता एस या मुलीने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत हा सगळा प्रकार सविस्तरपणे सांगितला आहे. पोलिसांनी या मुलींच्या चारित्र्याबद्दल अपमाजनक शब्द वापरले, तसेच तोकड्या कपड्यांवरुन वाईटसाईट बोलले, असा आरोप श्वेता एस हिने केला आहे. पीएसआय कामटे यांनी एका मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि चुकीचा स्पर्श केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या तिन्ही मुली पुण्यात नोकरी करतात, कोथरुड परिसरात राहतात. पोलीस सगळे मिसिंग केसची चौकशी या मुलींकडे करत होते. त्यांना कोणत्याही पद्धतीची मारहाण झाली नाही. तपासाचा भाग म्हणून काही प्रश्न विचारल्याचं कोथरुड पोलिसांनी सांगितलं आहे.

त्यांच्यासोबतच घडलेल्या या प्रकाराची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. आणि त्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पुण्यातील कोथरुड येथे पोलीसांनी तीन मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला ‘व्हॉट्सॲप’वर प्राप्त झाला आहे. जर हे खरे असेल तर ही अतिशय गंभीर स्वरुपाची घटना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. या एकंदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे…


Translate »
error: Content is protected !!