राजेंद्र नाना सोनवणे यांच्या हस्तक्षेपाने रेणुका नगरला पूर्ण दाबाने पाणी..!
🔥MK NEWS36
रेणुका नगरमध्ये कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी; नागरिकांमध्ये समाधान
बारामती : शहरातील रेणुका नगर परिसरात मागील काही दिवसांपासून कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने रहिवाशांनी अखेर संघर्ष शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश भैय्या महाडिक यांची भेट घेतली.

नागरिकांच्या अडचणी ऐकल्यानंतर महाडिक यांनी तत्काळ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. तसेच, समस्या मार्गी लागली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या भूमिकेची दखल घेत प्रभाग क्रमांक १८ चे नगरसेवक राजेंद्र नाना सोनवणे यांनी महाडिक यांच्याशी संपर्क साधून नागरिकांचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. त्यानुसार काही दिवसांतच रेणुका नगर परिसरात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
ऐन सणासुदीच्या काळात पाण्याचा प्रश्न निकाली निघाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या निमित्ताने रहिवाशांनी महाडिक व सोनवणे यांचे आभार व्यक्त केले.




