ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

महिला दिनानिमित्त सफाई कर्मचारी महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन..!


🔥MK NEWS36 

🌿 महिला दिनानिमित्त सफाई कर्मचारी महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन 🌿

बारामती : ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बारामती नगर परिषद, रेवती मंत्री फाउंडेशन आणि शिवन्या वेदिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सूर्यनगरी लेन नं. ३ येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अकॅडमी येथे सफाई कर्मचारी महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित या शिबिराचे उद्घाटन विधीवत अग्निकुंड प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला सक्षमीकरण, आरोग्य जनजागृती आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

शिबिरामध्ये सफाई कर्मचारी महिलांची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदाब, हिमोग्लोबिन, साखर आदी तपासण्या करून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व औषधोपचार देण्यात आले. तसेच महिलांमध्ये रक्ताची कमतरता टाळण्यासाठी व हिमोग्लोबिन वाढीस मदत व्हावी यासाठी खजुराचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे सफाई कर्मचारी महिलांना आरोग्याबाबत जागरूकता मिळाली असून त्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेले हे आरोग्य शिबिर समाजातील दुर्लक्षित घटकांच्या आरोग्य संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.


Translate »
error: Content is protected !!