ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

रस्त्यावर व्यापाऱ्यांचे साम्राज्य, नागरिक मात्र कोंडीत कैद!


🔥MK NEWS 36 

कोंडीत केडगाव : ‘पी-वन पी-टू’ फलक गायब, चौकीसमोर अराजक!

📰 बातमी

विनोद शेलार

केडगाव, प्रतिनिधी :
केडगाव परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्याचे नाव घेत नाही. व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणामुळे आणि त्यांच्या दादागिरीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असूनही कारवाईचा अभाव जाणवतोय.

व्यापाऱ्यांनी पेठेत रस्त्यावरच माल टाकून ठेवला आहे, तर मालवाहू ट्रॅक रस्त्यात उभे करून वाहतूक कोंडी निर्माण केली जाते. हे सगळं डोळ्यासमोर घडूनही पोलिसांची मौनबाधा का? आतापर्यंत किती दंड वसूल झाला, याची माहिती जनतेसमोर यायला हवी. पोलिस व व्यापारी यांच्यात मिलीभगत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतोय.

केडगाव हा नाका असल्याने २५ गावांतील लोक येथे बाजारासाठी येतात. मात्र पार्किंगची कोणतीही सोय नसल्याने लोक वाहनं रस्त्यावरच उभी करतात. परिणामी रस्त्यावर अडथळा वाढतो. पोलिसांनी ‘पी-वन पी-टू’ फलक लावून जनतेची दिशाभूल केली, पण आता ते बोर्डसुद्धा गायब झालेत. ही नेमकी प्रशासनाची उदासीनता की संगनमत? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होतोय.


Translate »
error: Content is protected !!