बारामतीत विनापरवाना फटाक्यांची वाहतूक करणारी ४ वाहने जप्त; ७ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…!
🔥MK NEWS36
“बारामतीत विनापरवाना फटाक्यांची वाहतूक करणारी ४ वाहने जप्त; ७ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत”
बारामती (प्रतिनिधी):
बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फलटण-बारामती रोडवर मळद गावच्या शिवारात चिंचबनजवळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्फोटक पदार्थ (फटाके) वाहतूक व बाळगण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसताना बेकायदेशीरपणे फटाक्यांची वाहतूक करणाऱ्या ४ वाहनांसह एकूण ७ लाख ७९ हजार ६२८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हवालदार वैभव भगवान साळवे (ब. नं. १७४८) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
💢या आरोपींवर गुन्हा दाखल:
१) सोमनाथ सदाशिव होले (वय ५४, रा. खंडोबानगर, बारामती)
२) संदिप युवराज नेटके (वय ३३, रा. साठेनगर, कसबा, बारामती)
३) गणेश बाबासाहेब गरगडे (वय ३२, रा. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा)
४) सुरेश बापूराव गवारे (वय ६०, रा. देसाई इस्टेट, बारामती)
📍अशी झाली कारवाई आणि जप्त केलेला मुद्देमाल:
पोलीस हवालदार वैभव साळवे व त्यांचे पथक दि. १६ जून २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास मळद गावच्या हद्दीत गस्तीवर असताना, त्यांना फलटण-बारामती रोडवरील चिंचबनजवळ चार संशयास्पद वाहने आढळून आली. या वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध कंपन्यांचे फॅन्सी फटाके आढळून आले. चालकांकडे या स्फोटक पदार्थांच्या वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नव्हता.
🚨पोलिसांनी जप्त केलेली वाहने आणि फटाके खालीलप्रमाणे:
तीन चाकी पिंजो (MH-42-M-1366): १,३३,५०० रुपये किमतीचे वाहन आणि त्यात ३३,५०० रुपयांचे AK30, SWEET 60, SPARKLE 120, INVISIBLE 240 शॉट्स फटाके.
तीन चाकी पिंजो (MH-45-7262): १,२६,३०० रुपये किमतीचे वाहन आणि त्यात २६,३०० रुपयांचे THUNDER, PEARL, HUKUM, CHELLAMS शॉट्स फटाके.
महिंद्रा विर (MH-53-B-7773): २,७९,८२८ रुपये किमतीचे वाहन आणि त्यात ७९,८२८ रुपयांचे ताजमहाल सिल्व्हर टेक, ताजमहाल लॉयन, किंग व गोल्ड फटाके.
अशोक लेलंड छोटा हत्ती (MH-42-AQ-4924): २,४०,००० रुपये किमतीचे वाहन आणि त्यात ४०,००० रुपयांचे २४ डिलक्स व इम्पेरियल रेड बिजली फटाके.
एकूण जप्त मुद्देमाल: ६,००,००० रुपये किमतीची चार वाहने आणि १,७९,६२८ रुपयांचे फटाके, असा एकूण ७,७९,६२८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
📍कायदेशीर कारवाई:
विनापरवाना धोकादायक स्फोटक पदार्थांची वाहतूक करून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५, २८७ आणि मोटार वाहन कायदा कलम ६६, १९२, १९०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईची नोंद दाखल अंमलदार महिला पोलीस हवालदार पवार (ब. नं. २०२५) यांनी केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (पोसई) भंडारे करीत आहेत.




