ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक

२२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू; ग्राहकांना दिलासा, श्रीमंतांना फटका


🔥MK NEWS 36 

जीएसटी काउन्सिलचा बिग डिसिजन; स्वस्त- महाग होणाऱ्या वस्तूंची यादी जाहीर..!

नवी दिल्ली :
जीएसटी परिषदेच्या 56व्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला असून, आता कर रचना सोपी करून फक्त दोनच दर ठेवण्यात आले आहेत. आतापर्यंत अस्तित्वात असलेले चार स्लॅब (5%, 12%, 18%, 28%) रद्द करून आता फक्त 5% आणि 18% हे दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. याशिवाय निवडक सिन आणि लक्झरी वस्तूंवर तब्बल 40% कर आकारला जाणार आहे.

हे नवीन दर २२ सप्टेंबर २०२५ पासून म्हणजेच नवरात्राच्या पहिल्या दिवशी लागू होणार आहेत. या बदलामुळे सामान्य ग्राहकांना आवश्यक वस्तू स्वस्त तर लक्झरी आणि नशा करणाऱ्या वस्तू महाग होणार आहेत.

स्वस्त होणाऱ्या वस्तू

जीवन आणि आरोग्य विमा (व्यक्तिगत पॉलिसी) आता शून्य टक्के जीएसटी म्हणजे पूर्ण सूट.

दूध, पनीर, पराठे, खाखरा, हरभरा यांसारख्या दैनंदिन खाण्याच्या वस्तूंना करमाफी.

तूप, माखन, चीज, सुका मेवा, बिस्किट्स, जॅम, आईस्क्रीम, कॉर्नफ्लेक्स यावर आता 5% कर (पूर्वी 12–18%).

हेअर ऑइल, साबण, शँपू, टूथपेस्ट, किचनवेअर, नूडल्स, पास्ता यासारख्या वस्तूंवर कर कमी होऊन 5%.

औषधे, वैद्यकीय उपकरणे, कृषी साधने, सायकल यावरही आता 5% कर.

छोट्या गाड्या (1200cc पेक्षा कमी), दुचाकी (350cc पेक्षा कमी), एसी, मोठे टीव्ही, डिशवॉशर यावर कर 18% (पूर्वी 28%).

कॅन्सरविरोधी औषधे आणि इतर आरोग्य साहित्य यावर कर मोठ्या प्रमाणात कमी.


महाग होणाऱ्या वस्तू

सिगारेट, पानमसाला, गुटखा, सौगंधी पेये, मद्य यावर थेट 40% कर.

लक्झरी गाड्या (1200cc/1500cc पेक्षा जास्त), उच्च क्षमतेच्या मोटरसायकली, यॉट्स, खाजगी विमानं यावर 40% कर लागू.

कोळसा यावर कर वाढून 18% होणार असल्याने वीज निर्मिती खर्च वाढण्याची शक्यता.

₹2,500 पेक्षा महाग कपडे आता 18% कराच्या कक्षेत (पूर्वी 12%).

परिणाम काय?

या निर्णयामुळे दैनंदिन वापरातील वस्तूंवरचा खर्च कमी होणार असून सामान्य ग्राहकांना दिलासा मिळेल. दुसरीकडे, लक्झरी आणि नशा करणाऱ्या वस्तूंवर मोठा बोजा येणार आहे. सरकारचा उद्देश महागाईवर नियंत्रण ठेवणे आणि ग्राहक खर्च वाढवणे, असा स्पष्ट केला जात आहे.


Translate »
error: Content is protected !!