ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक

“कुरकुंभ आरोग्य केंद्राचा ‘हेल्थ चेकअप’ – सीईओंनी दिले कौतुकाचे इंजेक्शन”


🔥MK NEWS 36

कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राची पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासकांकडून पाहणी

दौंड (प्रतिनिधी): दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

 

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक उपचार सुविधा, औषधसाठा, स्वच्छता व्यवस्था तसेच इतर सोयीसुविधांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.

गेल्या काही वर्षांत कुरकुंभ परिसरात वाढत्या लोकसंख्येनुसार आरोग्य सेवांची गरज लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या व दर्जेदार सेवा दिल्या जात आहेत. याबाबत समाधान व्यक्त करून श्री. पाटील यांनी केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

औषधसाठा नियमित उपलब्ध असल्याने नागरिकांना तत्काळ उपचार मिळतात व त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, स्थानिक नागरिकांचा आरोग्य दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हावेत, यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी श्री. पाटील यांनी केंद्रात येणाऱ्या रुग्णांची नोंदणी पद्धत, मातृ-शिशु आरोग्य सेवांचे स्वरूप, आपत्कालीन सेवा व ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत वेळेवर उपचार पोहोचविण्याबाबत तपासणी करून संबंधितांना कार्यक्षमतेने सेवा देण्याचे आवाहन केले.

कुरकुंभ व परिसरातील शेकडो नागरिक या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवांचा लाभ घेत असून या भेटीमुळे आरोग्य व्यवस्थेतील उणिवा भरून निघून येत्या काळात अधिक सक्षम आरोग्य सुविधा उभारल्या जातील, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.


Translate »
error: Content is protected !!