ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

दौंड तालुक्यात जातीय वैमनस्य – अनुसूचित जातीच्या कुटुंबावर हल्ला व जीवघेणी धमकी


🔥MK NEWS 36 

📰 दौंड तालुक्यात जातीय वैमनस्याचा स्फोट – अनुसूचित जातीच्या कुटुंबाला धमक्या, मारहाण

कोमल सोनवणे
दौंड प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील राजेगाव परिसरात जातीवाचक शिवीगाळ, मारहाण व जीवघेणी धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नितीन लक्ष्मण भोसले या तरुणाने दौंड पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली असून गावगुंड प्रवृत्तीच्या आरोपींविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता ही घटना घडली. भोसले दांपत्य घरी परतत असताना दिलीप उर्फ पप्पू मोहन वाघ व त्याची आई पदमा वाघ यांनी त्यांना रस्त्यात अडवले. “कोर्टातील केस मागे घे, नाहीतर तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं खल्लास करीन,” अशी धमकी देत दिलीप वाघ याने नितीन भोसले यांना जबर मारहाण केली. पत्नी मध्ये पडल्यावर तिलाही ढकलून खाली पाडण्यात आले.

या घटनेदरम्यान “तुमच्या महारांची लायकी आमच्या पाया जवळ आहे” अशा शब्दांत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. “जेलमध्ये गेलो तरी चालेल पण तुला संपवल्याशिवाय राहणार नाही,” असे आव्हान देत दिलीप वाघ याने धमकी दिली. त्याची आई पदमा वाघ हिनेही शिवीगाळ करत “या महारद्यांचा माज उतरवून टाक” असे उद्गार काढल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारदार नितीन भोसले यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, दिलीप वाघ हा कुप्रसिद्ध प्रवृत्तीचा असून २०२१ साली देखील त्याने लोखंडी पंपाने हल्ला करून जखमी केले होते. त्या प्रकरणी त्याच्यावर IPC कलम 326 नुसार गुन्हा दाखल असून केस अद्याप दौंड न्यायालयात प्रलंबित आहे.

या घटनेनंतर भोसले कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून “आमच्या जीवाला व कुटुंबाला धोका आहे, आरोपींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

👉 दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.


Translate »
error: Content is protected !!