३५० स्पर्धकांत दौंड आर्चरी असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी पटकावले अनेक पदकांचे मान..!
🔥MK NEWS36
दौंड आर्चरी असोसिएशनच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
पुणे (धायरी) येथे दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या खुल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धा २०२५ मध्ये दौंड आर्चरी असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून सुमारे ३५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. इंडियन राउंड, रिकर्व राउंड व कंपाउंड राउंड अशा तीन प्रकारात स्पर्धा खेळविण्यात आल्या.
स्पर्धेच्या विविध गटांमध्ये दौंडच्या विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे यश मिळविले—
१० वर्षाखालील मुले व मुली (कंपाउंड राउंड)
श्रेया हिवरकर – प्रथम क्रमांक
१० वर्षाखालील मुले व मुली (रिकर्व राउंड)
कृष्णा बडे – तृतीय क्रमांक
१० वर्षाखालील मुले व मुली (इंडियन राउंड)
शिवकन्या तळेकर – तृतीय क्रमांक
अवनी लांगे – तृतीय क्रमांक
रुद्राक्ष सकट – तृतीय क्रमांक
राजवीर सुद्रिक – तृतीय क्रमांक
प्रतीक वाघमारे – तृतीय क्रमांक
१३ वर्षाखालील मुले व मुली (कंपाउंड राउंड)
रोनक माने – तृतीय क्रमांक
१३ वर्षाखालील मुले व मुली (रिकर्व राउंड)
देवांश पिसाळ – तृतीय क्रमांक
१३ वर्षाखालील मुले व मुली (इंडियन राउंड)
श्रुती खेडकर – द्वितीय क्रमांक
या यशस्वी कामगिरीमागे संस्थेचे मार्गदर्शक श्री. मंगेश चव्हाण, प्रशिक्षक नितीन चव्हाण सर, करण भालेराव सर व गौरव गवळी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे श्री. संदीप शेलार (चिप रेल्वे तिकीट इन्स्पेक्टर, दौंड व नॅशनल रेल्वे मजदूर युनियन सेक्रेटरी, दौंड), श्री. हनुमंत वाघ (रेल्वे तिकीट इन्स्पेक्टर, दौंड), दौंड आर्चरी असोसिएशनचे संस्थापक श्री. महेश चव्हाण, तसेच दौंड योगा अँड स्पोर्ट असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा चव्हाण व उपाध्यक्ष सुधाकर यरोळ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दौंड आर्चरी असोसिएशनच्या या यशामुळे दौंड तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे.




