कुरकुंभमध्ये कंपन्यांचा कचरा फुंकला! लोकांच्या जीवाशी खेळ सुरूच..!
🔥MK NEWS 36
कुरकुंभ औद्योगिक परिसरात प्लास्टिक-केमिकल कचऱ्याचे प्रदूषण
✍️ कोमल सोनवणे,
प्रतिनिधी दौंड:
कुरकुंभ औद्योगिक वसाहती परिसरात कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा, वेस्टड्रम्स आणि वेस्टेज केमिकल लोकवस्तीच्या जवळ जाळण्याचा प्रकार सुरू असून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
कचरा जाळताना निघणाऱ्या काळ्या धुरामुळे परिसरात श्वसनाच्या आजारांचे प्रमाण वाढत असून अनेक नागरिकांनी डोळ्यांत जळजळ, श्वास घेण्यास त्रास, तसेच त्वचेच्या समस्यांचा अनुभव घेतल्याचे सांगितले. तरीसुद्धा प्रशासनाकडून किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

दरम्यान, नुकत्याच घडलेल्या घटनेत हा कचरा जाळताना आग आटोक्याबाहेर जाण्याची वेळ आली होती. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु वारंवार अशा प्रकारचा कचरा कंपन्यांमधून आणून जाळला जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नागरिकांचा प्रश्न असा आहे की –
कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कठोर कारवाई का होत नाही?
नागरिकांच्या जीवाशी खेळून केमिकल कचरा खुलेआम का जाळला जातो?
औद्योगिक परिसरातील या बेफिकीरीला कुणाचा आश्रय आहे?
स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करून हा घातक प्रकार कायमचा थांबवावा, अशी मागणी केली आहे.
👉 कुरकुंभसारख्या औद्योगिक भागातील पर्यावरण वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पुढाकार घेतला नाही तर कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.




